Mahadayi Water Dispute: गोवा बंद करण्याचे धारिष्ट विरोधकांमध्ये आहे काय?

अमित शहा यांच्या विधानानंतर गोव्यातील सुस्त जनताही आता जागी झाली आहे. लोक संतापलेले आहेत.
Mahadayi Water Dispute |
Mahadayi Water Dispute | Dainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: नीलेश काब्राल व सुभाष शिरोडकर यांनी अमित शहा यांचा निषेध नोंदविल्यावर विरोधकांना आयतेच कोलित सापडले. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ते खोटे बोलत असल्याचा आरोप चालवला आहे. वास्तविक भाजपाचा दावा आहे, मुख्यमंत्र्यांना हे मंत्री बोलतील, याचा पत्ताच लागला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर अमित शहा यांच्याशी फोनवर बोलणे केले.

अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल लोक गोव्यात संतापले असल्याची माहितीसुद्धा त्यांना दिली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे सौम्य शब्दात ऐकविले. निषेध करण्याचा स्वभाव मुख्यमंत्र्यांमध्ये नाही, ते तसे मृदू स्वभावाचे आहेत.

परंतु काब्राल व शिरोडकर यांच्या निवेदनामुळे भाजपची काहीशी पडती बाजू सावरली गेली. निरीक्षक म्हणतात, अमित शहा यांच्या विधानानंतर गोव्यातील सुस्त जनताही आता जागी झाली आहे. लोक संतापलेले आहेत. उद्या गोवा बंद झाला, तरी लोक उत्स्फूर्तपणे आस्थापने बंद ठेवू शकतात. परंतु गोवा बंद करण्याचे धारिष्ट विरोधकांमध्ये आहे काय?

Mahadayi Water Dispute |
Sanjivani sugar factory: संजीवनी साखर कारखान्यातील ऊस तोडणी यंत्र पुन्हा कार्यान्वित

बाबूंचा लोकसभा मनसुबा

माजी मुख्यमंत्री असलेले बाबू कवळेकर यांना आता लोकसभेवर जावे, असे वाटू लागलेले आहे. त्यांनी ही आपली इच्छा लपवूनही ठेवलेली नाही. त्यांचे समर्थक म्हणतात, की यापूर्वी कधी त्यांनी लोकसभेचा विचार केला नव्हता, की केपेबाहेर पाऊल टाकण्याचे त्यांच्या मनातही नव्हते. पण केपेतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

संपूर्ण मतदारसंघ बांधून काढूनही जर पराभव पदरी येतो, तर त्यावर विसंबण्यात अर्थ नाही, असे मनोमन ठरवून त्यांनी लोकसभेचा विचार चालविला आहे.

नाही तरी विधानसभा निवडणुकीत हरलेल्याला त्यानंतरची लोकसभा निवडणूक हात देते, हे सार्दिन यांनी दोनदा तर रवी व भाऊंनी एकेकदा दाखवून दिले आहे. म्हणून कदाचित बाबूही कामाला लागलेले असावेत.

Mahadayi Water Dispute |
Waste Disposal: ‘एमआरएफ’वरून खंडपीठाने चार पंचायतींना खडसावले

तानावडे यांना घुमट भेट!

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा वाढदिवस काल धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. गोव्यातील कानाकोपऱ्यातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि हितचिंतक आले होते. आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी फुलांचे गुच्छ आणू नयेत, असे सदानंद भाईनी म्हणे सर्वांना सांगितले होते.

त्यामुळे कुडतरी येथील मंडळाने एक भलतीच शक्कल लढविताना त्यांना गावडा समाजाची एक अस्सल खूण असलेले घुमट भेट दिले. सदानंद भाईंना मिळालेल्या सर्व भेटीमध्ये हीच भेट उठून दिसत होती.

ज्या कुडतरी मतदारसंघात एक काळ असा होता, की भाजप हे नाव देखील तिथे कोणी घेत नव्हेत. आज त्याच कुडतरीत भाजप मंडळ सर्वांपेक्षा अधिक जोमाने काम करू लागले आहे. याला काळाचा महिमा असे म्हणायचे का?

अस्वस्थता कायम

म्हादईचा गोंधळ व राजकीय पेच यामुळे प्रमोद सावंत सरकार काही प्रमाणात बचावात्मकतेकडे झुकले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास सरकारला वेळ नाही. केवळ दोन आमदारांनाच महामंडळे दिल्याने नवागत भाजप आमदार अस्वस्थ आहेत.

दोन सदस्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे तेही अस्वस्थ आहेत. आता गोवा सरकारच्या अर्थसंकल्पानंतरच मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणे त्यावर विचार करणार आहेत.

Mahadayi Water Dispute |
Panjim Municipality: महापालिकेचा कारभार होणार स्थलांतरित

नशीबवान नर्सिंग विद्यार्थी!

भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है! असे म्हणतात, त्याचा अनुभव गोव्यातील सरकारी नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या नर्सिंग विद्यार्थ्यांनी घेतला. राजभवनात प्रवेश करण्याचे व तेही दरबार हॉलमध्ये कार्यक्रम करण्याचे भाग्य भाग्यवंतानाच लाभते.

राज्यपालांचे राजभवनात निमंत्रण केवळ व्हीव्हीआयपीना व काही राज्य स्तरावरील व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त बुदवंतानाच असते किंवा मंत्रिमंडळाच्या शपथ विधी सोहळ्यात कार्यकर्त्याना राजभवन पाहण्याची संधी प्राप्त होते.

नर्सिंग विद्यार्थ्यांनी आपले स्नेहसंमेलन राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित करून एक वेगळाच आनंद घेतला, यात संशय नाही, त्याच बरोबर एका नव्या परंपरेची ही नांदी असावी.

राजीनामा घोषणा व आवाहने

केंद्राने कर्नाटकाच्या म्हादई विषयक डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर गोव्यात वादळ उठून सरकारच्या राजिनाम्याच्या मागणीने जोर पकडला होता.

त्यातून श्रीपादभाऊंनी दिलेल्या राजिनामा इशाऱ्याचे तर राष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले होते, पण नंतर सर्व काही शांत झाले. शनिवारी अमित शहांनी कर्नाटकात म्हादई विषयावर जे वक्तव्य केले.

त्यामुळे गोव्यातील स्थिती बाँब पडल्यासारखी झाली. पुन्हा राजिनाम्याची मागणी होऊ लागली आहे. पण स्वतःहून राजिनामा देण्याची तयारी नाही, जो उठतो तो दुसऱ्याचा राजिनामा मागतो. त्यामुळे लोकांची फुकटात करमणूक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com