Madgaon Municipality  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water: म्हादईवरून मडगाव पालिकेत खडाजंगी; विशेष ठराव मंजूर

म्हादईच्या संरक्षणासाठी गोव्याच्या लोकलढ्यासाठी मडगाव पालिका बैठकीत खास ठराव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water: म्हादईसाठी केवळ गोवा फॉरवर्ड लढा देत होते, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळत नव्हता, असे मडगाव पालिका बैठकीत नगरसेवक पूजा नाईक म्हटल्यानंतर भाजपचे नगरसेवक कामिल गोन्साल्विसयांनी विरोधी पक्ष म्हादईप्रश्र्नी लोकांमध्ये गैरसमज पसरविला जातो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले.

तेव्हा बरीच शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर बरीच चर्चा झाली आणि अखेर म्हादईच्या समर्थनार्थ ठरावही मंजूर करण्यात आला.

म्हादईच्या संरक्षणासाठी गोव्याच्या लोकलढ्यासाठी मडगाव पालिका बैठकीत खास ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी पक्षीय व इतर राजकारण बाजूला ठेवून म्हादई लढ्यासाठी सर्व नगरसेवक एकसंघ राहून लढा देतील, अशा यावेळी निर्धार करण्यात आला.

लढ्याला ज्या ज्या स्तरावर पाठिंब्याची गरज आहे, तिथे सर्व नगरसेवक उपस्थित राहतील, असेही कालच्या बैठकीत ठरविण्यात आले. काही कन्नडिगांचाही लोकलढ्याला पाठिंबा आहे, अशी माहिती यावेळी महेश आमोणकर यांनी दिली. कालच्या बैठकीतील ठराव पंतप्रधान, केंद्रीय जलस्त्रोत मंत्री व गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

घनश्याम शिरोडकर म्हणाले, कर्नाटकचे जलस्त्रोतमंत्री देत असलेली धमकी व दादागिरी गोमंतकीय खपवून घेणार नाहीत. हा केवळ उत्तर गोव्याचा प्रश्र्न नसून कालांतराने दक्षिण गोव्यालाही त्याचा त्रास जाणवणार आहे. ज्या पर्यावरण प्रेमींनी 20 वर्षांपूर्वी म्हादई संदर्भात जे भाकीत केले होते त्याची प्रचिती आता येत आहे. आम्ही सर्वांनी या पर्यावरण प्रेमींबरोबर राहणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT