Mahadayi Water Dispute |Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: सत्य काय ते शेवटी बाहेर आलेच; शहांनीच दिली कबुली

म्हादईचे पाणी वळविणे हा कर्नाटक आणि गोवा सरकारने घेतलेला संयुक्त निर्णय आहे, असे शहा यांनी म्हटले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादईचा सौदा कर्नाटककडे करण्यात गोवा सरकारही भागीदार आहे, हा आम्ही जो आरोप करत होतो, तो आता सिद्ध झाला आहे. खुद्द केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी तशी थेट ग्वाही दिली आहे.

सत्य काय ते शेवटी बाहेर आलेच, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

प्रमोद सावंत यांनीच म्हादईचा खून केला आहे. म्हादईचे पाणी वळविणे हा कर्नाटक आणि गोवा सरकारने घेतलेला संयुक्त निर्णय आहे, असे शहा यांनी म्हटले.

हे जर खरे नसेल तर मुख्यमंत्र्यानी केंद्रीय नेतृत्वाला जाब विचारावा, अन्यथा त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे.

कर्नाटकच्या पाणी पिपासू शेतकऱ्यांची तहान भागविण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी म्हादईचा गळा घोटला. हे सैतानी कृत्य आहे. आपली खुर्ची सांभाळून ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील पुढील पिढीला दुष्काळाच्या गर्तेत नेऊन सोडले आहे.

मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा बस्स झाला, आता त्या पदावर त्यांना राहण्याचा अधिकार नाही, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT