Home Dainik Gomantak
गोवा

Madgoan Illegal Home: बेकायदा घरांना क्रमांकासाठी आग्रह का?

बेकायदेशीर घरांना क्रमांक द्या, असा आग्रह आजगावकर कसा करू शकतात, असा सवाल अँथनी बार्बोझा यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आपल्याला दवर्लीत प्रचारासाठी पाठविले होते, असे बाबू आजगावकर सांगतात. पण बेकायदेशीर घरांना क्रमांक देण्यासाठी त्यांना पाठविले होते का, असा सवाल भाजपचे एसटी समाजाचे नेते अँथनी बार्बोझा यांनी काल केला.

दवर्लीचे सरपंच हर्क्युलान नियासो यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी काल बार्बोझा यांनी दवर्ली पंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बार्बोझा म्हणाले, ज्या जागेवर ही घरे बांधली आहेत, ती जागा ‘18-क’ खाली अधिसूचित असून अशा जागेचा फक्त शेतीसाठी वापर करता येतो.

अशा जागेत ही घरे बांधलीच कशी आणि या बेकायदेशीर घरांना क्रमांक द्या, असा आग्रह आजगावकर कसा करू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

दवर्ली पंचायतीत बहुतेक पंच सदस्य एसटी समाजाचे असून त्यांना कुणी धमकावल्यास इतर एसटी बांधव गप्प राहाणार नाहीत.

कोमुनिदाद आणि खासगी जागेत बेकायदेशीरपणे घरे बांधून राहाणाऱ्यांच्या घरांना क्रमांक देण्यावरून जो प्रश्र्न उपस्थित झाला आहे, त्याला आता राजकीय रंग येऊ लागला आहे. ही घरे जरी नेमकी कधी उभारली, हे जरी पक्के कळत नसले तरी ती 10 ते 15 वर्षांपूर्वीची घरे आहेत.

या सुमारे 165 घरांना क्रमांक देण्यास दवर्ली पंचायतीने कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून नकार दिला असून त्यामुळे येथील राजकारण तापले आहे. केवळ हीच नव्हे, तर आणखी असंख्य बेकायदेशीर घरमालक या परिसरात आहेत, जे क्रमांक मिळण्याची वाट पाहात आहेत. आता स्थानिकांनी घर क्रमांक देण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी खास ग्रामसभा बोलवावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT