Journalists Day: कौटुंबिक सत्‍काराने कृतकृत्‍य झालो’

मराठी पत्रकार दिनी दैनिक ‘गोमन्‍तक’ने ज्‍येष्‍ठ पत्रकारांचा गौरव केला.
Journalists Day
Journalists DayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: मराठी पत्रकार दिनाचे औचित्‍य साधून ‘गोमन्‍तक’ने संस्‍थेसाठी 30 वर्षांहून अधिक काळ अविरत व नि:स्‍पृह योगदान दिलेल्‍या ज्‍येष्‍ठ पत्रकारांचा शुक्रवारी हृद्य सत्‍कार केला. ‘मुक्‍त गोव्‍यातील पहिले दैनिक म्‍हणून सामाजिक उत्‍थानासाठी भरीव कार्य करणारे ‘गोमन्‍तक’ आमच्‍यासाठी कुटुंब असून, घरच्‍या गौरवाने आम्‍ही भारावलो आहोत’, अशा भावना व्‍यक्‍त करत सत्‍कारमूर्तींनी वाटचालीचा अल्‍पाक्षरी आढावा घेतला.

ज्‍येष्‍ठ पत्रकार तथा साहित्‍यिक रमेश वंसकर, मोहन वेरेकर, प्रकाश तळवणेकर, मनोदय फडते, नरेंद्र तारी, तुकाराम सावंत, सुभाष महाले, यशवंत पाटील, विलास महाडिक यांना ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्‍या हस्‍ते भेटवस्‍तू व पुष्‍प देऊन गौरविण्‍यात आले.

राजू नायक यांनी ‘दर्पण’कार बाळशास्री जांभेकर यांच्‍या कार्याला उजाळा दिला. तदनंतर ‘गोमन्‍तक’च्‍या प्रारंभापासूनचे विविध टप्‍पे विषद करत, दैनिकाचे सामाजिक-सांस्‍कृतिक जडणघडणीतील योगदान अधोरेखित केले.

बा. द. सातोस्‍कर, माधव गडकरी, नारायण आठवले यांनी संपादक या नात्‍याने उमटवलेला अवीट ठसा आणि ‘गोमन्‍तक’ने गोंयकारांना दिलेली नवी दृष्‍टी याविषयी त्‍यांनी भाष्‍य केले.

Journalists Day
Mollem Forest of Goa: करंझोळ रेल्वे स्टेशनवर पट्टेरी वाघाचे दर्शन

या दीर्घ प्रवासात समर्पित वृत्तीने व सातत्‍यपूर्ण उल्‍लेखनीय योगदान देणारे ज्‍येष्‍ठ पत्रकार हे ‘गोमन्‍तक’चे शिलेदार आहेत. त्‍यांच्‍याच बळावर दैनिकाने वाचकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले आहे, अशा शब्‍दांत नायक यांनी ज्‍येष्‍ठांच्‍या कार्याचा गौरव केला.

या प्रसंगी गौरवमूर्तींनी मनोगत व्‍यक्‍त केले. हेमा फडते, प्रकाश तळवडकर, चित्रा क्षीरसागर व ‘गोमन्‍तक’चे कर्मचारी यावेळी उपस्‍थित होते.

व्‍यावसायिक अपरिहार्यतेमधून काल पत्रकारितेचे आयाम बदलत आहेत. तथापि, गोमन्‍तक त्‍याला अपवाद ठरला आहे. संपादक-संचालक राजू नायक यांनी माजी संपादक माधव गडकरी यांची गौरवशाली परंपरा जपली आहे.

म्‍हादईसह अनेक राजकीय, सामाजिक ज्‍वलंत विषयांवर ‘गोमन्‍तक’ने सडेतोड भूमिका घेतली असून, आमच्‍यासाठी ही अभिमानाची बाब आहे, अशा प्रतिक्रियाही ज्‍येष्‍ठ पत्रकारांनी व्‍यक्‍त केल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com