Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : ११ तृतीयपंथी करणार मतदान; प्रथमच बजावणार हक्क

Loksabha Election 2024 : मडगावातील २० ट्रान्सजेंडरची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

मडगावमधील ‘ट्रान्सजेंडर’ अर्थात तृतीय पंथीय व्यक्ती पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मडगाव येथील झरीन आणि हिना ट्रान्सजेंडर रहिवासी आहेत. त्‍यांना या लोकसभा निवडणुकीत पहिल्‍यांदाच यावेळी मतदान करायला मिळणार आहे.

जानेवारीत झालेल्‍या मतदार दिनाच्‍या कार्यक्रमात त्‍यांना त्यांचे मतदान ओळखपत्र देण्यात आले हाेते. मडगावात २० तृतीय पंथीय मतदारांची नाेंद झालेली असून त्‍यापैकी ११ जणांना मतदानाचा हक्‍क प्राप्‍त झाला आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातून प्राप्‍त झाली आहे.

आमच्यासाठी ही अपूर्व अशी संधी आहे. ट्रान्सजेंडर म्हणून, आम्ही पहिल्यांदाच मतदान करणार आहोत. आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, ही आमच्‍यासाठी आनंदाची गोष्‍ट आहे, असे झरीनने सांगितले.

हिनानेही अशीच भावना व्यक्त केली. मडगावमधील २० पैकी ११ ट्रान्सजेंडर व्यक्तींनी दक्षिण गोव्यात त्यांचा मतदानाचा हक्क मिळवला आहे. या समुदायाच्या अधिकारांबाबत माहिती घेतल्यावर असं समजलंय की, या समुदायाच्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१४ मध्ये या समुदायाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळावा, संविधानातील मूलभूत मूल्यांच्या आधारे न्याय मिळावा, याबद्दलचा क्रांतिकारक निर्णय दिला होता.

‘वेगळी ओळख’ हक्क अबाधितच!

स्वत:चं लिंग ठरवण्याचा अधिकार व्यक्तीला असावा, आणि ही ओळख स्त्री आणि पुरूष या दोन्हीपेक्षा अन्यही असू शकते, हे न्यायालयाने मान्य केले.

केवळ या ‘वेगळ्या’ ओळखीमुळे देशात कोणीही कुठेही ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही, किंबहुना नागरिक म्हणून त्याचे हे सर्व अधिकार सुरक्षित आहेत, हेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT