Ibrahim Palak Goa Viral Video: स्लो मोशन में! सैफचा मुलगा अन् श्वेता तिवारीची मुलगी प्रेमात, गोवा रिटर्न व्हिडिओ व्हायरल

Ibrahim Palak Goa Viral Video: सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी रिलेशनशिपमध्ये आहेत का?
Ibrahim Palak Goa Viral Video
Ibrahim Palak Goa Viral VideoDainik Gomantak

Ibrahim Palak Goa Viral Video

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी रिलेशनशिपमध्ये आहेत का? हा असा प्रश्न हल्ली सातत्याने उपस्थित केला जात. दोघांचे चाहते बऱ्याच काळापासून याचे उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत.

तर, इब्राहिम आणि पलकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, नुकतेच दोघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. शुक्रवारी अमृता सिंग आणि इब्राहिम अली खान, सारा अली खान आणि पलक तिवारी मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. सर्वजण गोव्यात एकत्र व्हॅकेशनसाठी गेल्याचे सांगितले जात आहे.

Ibrahim Palak Goa Viral Video
Goa Congress: भाजपचे धोरण 'मिशन टोटल कमिशन'; हाच का मोदींचा विकसीत भारत? खलप यांचा सवाल

सारा आणि इब्राहिम दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. साराने गोव्यातून शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तिने इब्राहिमला टॅग देखील केले आहे. पापाराझींनी दोघांना विमानतळावर स्पॉट केले तेव्हा दोघांनी हसून फोटोसाठी पोझ दिली.

साराने पांढरा टॉप आणि पँट घातली होती तर इब्राहिम अली खान ट्रॅकसूटमध्ये होता. अभिनेत्री पलक तिवारीही विमानतळावर जॉगर्स आणि ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसली.

इब्राहिम आणि पलक विमानतळावर येण्याची वेळ पुढेमागे होती मात्र, थोड्या फरकाने ते एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा समोर येऊ लागल्या आहेत. पलक तिवारी गोव्यात खान कुटुंबासोबतच होती का? असाही अंदाज बांधला जात आहे.

Ibrahim Palak Goa Viral Video
Janaseva Urban Society : ‘जनसेवा अर्बन’च्या २५ वर्षे सेवेचे कौतुक : प्रकाश वेळीप

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, दोघांनीही या प्रश्नावर आतापर्यंत मौन बाळगले आहे. दोघेही अनेकदा डिनर डेट आणि पार्टीत स्पॉट झाले आहेत.

इब्राहिम अली खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांमध्ये 'सरजमीन' आणि 'नादानियां' यांचा समावेश आहे. पलक तिवारी सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com