Madgaon SDM rejects objections on railway double track project Dainik Gomantak
गोवा

रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पावरील आक्षेप मडगाव SDM ने फेटाळला

उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय वडिलोपार्जित घर असलेल्या पिडीत जमीन मालकांच्या विरोधात होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पासाठी पाचपैकी दोन हरकतींवर मडगाव उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांच्या कार्यालयात सुनावणी झाली असुन दोन्ही हरकती मंगळवारी फेटाळण्यात आल्या आहेत. (Madgaon SDM rejects objections on railway double track project)

गोंयंचो एकवोट (जीई) या संघटनेने दुहेरी ट्रॅकिंग प्रकल्प (Railway Double Track) आणि भूसंपादनाच्या कारवाईच्या विरोधात लढा देत स्थानिक आणि इतर नागरिकांकडून प्रकल्पाविरोधात सतत विरोध केला होता.

जीईचे वकील अ‍ॅडव्होकेट सियोला वास यांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम रेल्वेच्या (SWR) दुहेरी ट्रॅकिंगसाठी भूसंपादनासाठी सुनावणी करण्यात आली असुन वेलसाओ येथील काही पिडीत रहिवाशांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय वडिलोपार्जित घर असलेल्या पिडीत जमीन मालकांच्या विरोधात होता.

काही तांत्रिक बाबी आहेत ज्या भूमापनासाठी नोटीस देण्यापूर्वी सर्वेक्षकांनी विचारात घेतल्या नाहीत. जीईचे नेते ओलेन्सिओ सिमोस यांनी पुढे आरोप केला की, गोवा (Goa) राज्यातील संपूर्ण प्रशासन आमच्या मूळ गावांमधून कोळशाची वाहतूक करण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडत आहेत. या बदल्यात त्यांच्या भांडवलदारांना राज्यासाठी कोणताही फायदा होत नसून फक्त दडपशाही करत आहेत.जीईने सांगीतले की जोपर्यंत सरकार जनतेचे ऐकत नाही तोपर्यंत ते तीन रेखीय प्रकल्पांविरुद्ध जनजागृती मोहीम अधिक तीव्र करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT