कुंकळ्ळीतील छत्रोत्सवात धार्मिक एकोपा

भाविकांची अलोट गर्दी: हिंदूंबरोबर ख्रिस्ती भाविकांचाही सहभाग, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
छत्रोत्सव
छत्रोत्सवDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: हिंदू ख्रिस्ती भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या वार्षिक छत्रोत्सवात हजारो भाविकांनी गुलालाची उधळण करीत, धोल ताशांच्या गजरात बारा छत्र्या नाचवत छत्रोत्सवाचा आनंद घेत देवीचे दर्शन घेतले.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा वार्षिक छत्रोत्सव मंगळवारी 22 रोजी धडाक्यात साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षें कोविडच्या भीतीमुळे भाविक पारंपरिक छत्रोत्सवात सहभागी होऊ शकले नव्हते.

छत्रोत्सव
चांदरमधील तरुणाचं पार्थिव गोव्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु

भाविकांनी गेल्या दोन वर्षांची कसर यंदा भरून काढत आनंदोत्सव साजरा केला. दुपारी सव्वाबाराला देवीच्या पालखी मिरवणुकीला फातर्पा येथून सुरवात करण्यात आली. दुपारी बारा वाजता धार्मिक विधी झाल्यावर देवीला भक्तांनी गुलाल अर्पण केला. बारा छत्र्या नाचवत धोल ताशाच्या गजरात देवीचा जयजयकार करीत देवीची पालखी मिरवणूक पारंपरिक गोविंद घाटी मार्गाने मल्लागिणी, जुझेंगाळ, सिद्धनगर, नायगिलो, भिवसा, व्होडी या मार्गाने मूळस्थानी तलयेभाट येथे आणण्यात आली. भक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी देवीचे स्वागत करून देवीला नारळ ओटीची भेट अर्पण करून देवीचे आशीर्वाद घेतले.

छत्रोत्सव
वास्कोत ‘घुमचे कटर घूम’नाद घुमला

साडेचारशे वर्षांची परंपरा अखंडित

देवी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानाला मोठा इतिहास आहे. सोळाव्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगीजसत्तेने राज्यात धर्मातरण सुरू केले तेव्हा स्वधर्म व स्वराज्यासाठी कुंकळ्ळीकरांनी मोठा लढा दिला. त्याचकाळी धर्मरक्षणासाठी फातर्पा या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. त्यानंतर देवी तेव्हापासून फातर्पा येथे स्थापित करण्यात आली. देवीने भक्तांना दृष्टात देऊन फाल्गुन पंचमीला आपल्याला मूळस्थानी तळयेभाट येथे बारा वागड्याच्या उपस्थितीत वाजत गाजत बारा छत्र्या नाचवत नेण्याचे फर्मान काढल्याचे जाणकार सांगतात. गेली साडे चारशे वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू असून, यंदाच्या छत्रोत्सवात भक्तांनी उत्साहाने भाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com