Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगाव रेल्वे स्थानकावरून मुलीचे अपहरण; आरोपीस 10 वर्षांची शिक्षा, 20 हजार दंडही

Margao: मडगाव रेल्वे स्थानकावरून २०१७ साली अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी रिझवान इंदू याला बालहक्क न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

Sameer Amunekar

पणजी: मडगाव रेल्वे स्थानकावरून २०१७ साली अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपी रिझवान इंदू याला बालहक्क न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल आज (९ जुलै) गोवा बाल न्यायालयाने सुनावला.

२०१७ पासून आरोपी तुरुंगात असल्यामुळे त्याने आतापर्यंत सुमारे सात वर्षांचा तुरुंगवास भोगलेला आहे, त्यामुळे उर्वरित तीन वर्षांचा शिक्षा कालावधी बाकी आहे. बालहक्क न्यायालयाने दिलेल्या निर्णयात आरोपीवर दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले आहे.

भारतीय दंड संहिता कलम ३६३(ए) (अपहरण) अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व २०,००० रुपयांचा दंड आरोपीला दिला असून तो दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष तुरुंगवास वाढवून मिळेल.

तसेच कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षांची शिक्षा व १०,००० रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाची शिक्षा व गोवा बालहक्क संरक्षण अधिनियम २००३ चे कलम ८(२) अंतर्गत ३ वर्षे तुरुंगवास व ५,००० रुपयांचा दंड दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची शिक्षा वाढवून मिळेल, असे देखील बालहक्क न्यायायलाने स्पष्ट केले आहे.

घटनेची पार्श्वभूमी

ही घटना ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१७ च्या मध्यरात्री घडली होती. पीडित मुलगी आपल्या पालकांसह मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर झोपलेली असताना, आरोपीने तिला जबरदस्तीने पळवून नेले होते.

या घटनेनंतर कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक आणि विद्यमान पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

Goa Farmers: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! प्रतिहेक्टर अर्थसाहाय्य योजना होणार बंद; यंदापासून प्रतिमेट्रीकनुसार भाव

Rashi Bhavishya 13 July 2025: आर्थिक व्यवहारात फायदा, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT