FIR Dainik Gomantak
गोवा

Sunayana Desai Death Case: सुनयना देसाई मृत्‍यूप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांविरुद्ध गुन्‍ह्याची नोंद; हलगर्जीपणाचा ठपका

Goa Crime: सुनयना देसाई हिच्‍या मृत्‍यू प्रकरणाला ईएसआय इस्‍पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्‍वजीत फळदेसाई यांना दोषी धरून मडगाव पोलिसांनी त्‍यांच्‍याविरोधात गुन्‍हा नोंदविला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गणेमरड-शेल्‍डे (केपे) येथील सुनयना देसाई हिच्‍या मृत्‍यू प्रकरणाला ईएसआय इस्‍पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्‍वजीत फळदेसाई यांना दोषी धरून मडगाव पोलिसांनी त्‍यांच्‍याविरोधात गुन्‍हा नोंदविला आहे.

ही दुर्घटना १५ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली होती. डाव्‍या हाताच्‍या अंगठ्यावर छोटीशी शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी या महिलेला मडगावच्‍या (Madgaon) ईएसआय इस्‍पितळात दाखल केले हाेते. मात्र, इस्‍पितळात ही शस्‍त्रक्रिया केली जात असताना ती महिला मृत पावली. या महिलेच्‍या नातलगांनी केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे हा मृत्‍यू सकाळी झालेला असतानाही सायंकाळपर्यंत त्‍यांना कोणतीही कल्‍पना दिली नव्‍हती.

या प्रकरणात मृताच्‍या नातेवाईकांनी मडगाव पोलिसांत तक्रार देण्‍याचा प्रयत्‍न केला हाेता. मात्र, सुरुवातीला ही तक्रार नोंदविण्‍यात आली नव्‍हती. त्‍यामुळे मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायालयात दाद मागितली असता, ९ ऑक्‍टोबर रोजी न्‍यायालयाने (Court) डॉ. फळदेसाई यांच्‍याविरोधात गुन्‍हा नोंद करा, असा आदेश दिला. त्‍यानुसार काल रात्री हा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT