Nitin Chandrakant Desai Death: धक्कादायक! कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या; स्टुडिओमध्येच घेतला गळफास

Nitin Chandrakant Desai Death: हिंदीमध्ये देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, लगान आणि मराठी मध्ये फर्जंद, बालगंधर्व या चित्रपटात त्यांनी कलादिग्दर्शकांचे काम केले आहे.
Nitin Chandrakant Desai
Nitin Chandrakant DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Nitin Chandrakant Desai Death: चित्रपटसृष्टीसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, नितिन देसाईंनी कर्जतजवळील एनडी स्टुडिओ मध्ये त्यांनी गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीत नितिन देसाईंनी देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, लगान तर मराठी चित्रपटसृष्टीत फर्जंद, बालगंधर्व, अजिंठा, चिंटू, हरिश्चंद्राची फॅक्टरी या सुप्रसिद्ध चित्रपटात त्यांनी चित्रपटात कलादिग्दर्शकांचे काम केले आहे.

  • 4 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नितिन देसाईंनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. माचीस, डॉन, अकेले हम अकेले तुम, हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर, मिशन कश्मीर, खारी, स्वदेश आणि प्रेम रतन धन पायो, बादशाह अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते.

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांना 2000 मध्ये हम दिल दे चुके सनम आणि 2003 मध्ये देवदाससाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

एवढेच नाही तर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटासाठी नितीन देसाई सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच डॉ. अमोल कोल्हे( Amol kolhe) यांची मुख्य भूमिका असलेल्या राजा शिवछत्रपति या स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी मालिकेची निर्मिती त्यांनी केली होती.

नितिन देसाईंच्या चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामाबरोबरच त्यांचे इतर कामही प्रसिद्ध होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपछविधीचा 20 तासात त्यांनी भव्यदिव्य स्टेज उभारला होता.

Nitin Chandrakant Desai
Mahesh Bhatt Emotional In Bigg Boss OTT: एक काळ असाही होता म्हणत महेश भट्ट झाले भावूक

नितिन देसाईंच्या आत्महत्येची बातमी मिळाल्यानंतर सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. आदेश बांदेकर यांनी नितिन देसाईंनी संवाद साधायला हवा होता, अशाप्रकारे त्यांनी जीवनप्रवास संपवायला नको होता असे म्हणत शोक व्यक्त केला आहे. याबरोबरच डॉ. अमोल कोल्हे यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याचे म्हणत दु:ख व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com