Collector Office South Goa Dainik Gomantak
गोवा

Madgaon News: 'शहरातील बेकायदा जाहिराती ताबडतोब हटवा'!! मडगावात जिल्हाअधिकाऱ्यांचे आदेश सक्तीचे

Illegal Advertisements: येत्या ४५ दिवसांत मोहीम राबवून सर्व प्रकारचे बॅनर्स, पोस्टर्स किंवा जाहिराती काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत

Akshata Chhatre

मडगाव: मडगाव शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीररीत्या जाहिराती लावल्या आहेत आणि यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होतेय. यावर कारवाई करत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटीस यांनी येत्या ४५ दिवसांत एक मोहीम राबवून सर्व प्रकारचे बॅनर्स, पोस्टर्स किंवा जाहिराती काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटीस यांनी जारी केलेल्या आदेशात त्यांनी मडगावमधील संबंधित अधिकाऱ्यांना सर्व बेकायदेशीर जाहिराती काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण गोवा जिल्हा अधिकाऱ्यांकडून गोवा मालमत्ता विद्रुपता प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अंतर्गत हा आदेश देण्यात आलाय.

बेकायदेशीरपणे जाहिराती किंवा बॅनर्स लावल्याने शहर विद्रुप होते आणि परिणामी नागरिक तसेच पर्यटकांची गैरसोय होते. सध्या मडगाव शहरात वळणांवर, रस्त्यांवर पुलांवर तसेच फलकांवर जाहिराती लावल्या गेल्यात आणि शहराचे हेच विद्रुपीकरण थांबवण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश जिल्हा अधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय.

ही कारवाई पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आलाय. याकाळात त्यांना शहरातील सर्व बेकायदा बॅनर्स, पोस्टर्स किंवा जाहिराती काढणं भाग असणार आहे. शिवाय वेळोवेळी अशी कारवाई करण्यात यावी आणि शहराचे विद्रुपीकरण न होण्यासाठी जनजागृतीही करण्यात यावी अशीही आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT