
मडगाव: एका अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी या घटनेची तक्रार नोंदवल्यांनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनंतर मडगाव पोलिसांनी यामध्ये सामील तीन अल्पवयीन मुलांची अपना घरात रवानगी केली आहे.
तिघा आरोपींनी एकत्र येत अल्पवयीन मुलांच्या साहाय्याने पीडित मुलाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्याला धमक्या देखील देण्यात आल्या होत्या.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरवून अल्पवयीन मुलाची बदनामी केल्याचा आरोपही आरोपींवर करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पोलीस या घटनेचा घटनेमागील हेतू तपासत असून याबद्दल आणखीन पुरावे शोधले जात आहेत .
उसगाव ग्रामपंचायतीचे सचिव होनाजी अनिल मोरजकर (वय ५५ वर्षे) याच्याविरुद्ध एका युवतीने विनयभंगाची तक्रार फोंडा पोलिसांत आज (मंगळवारी) दाखल केली. सत्तरी भागातील ही युवती सर्व्हेअर म्हणून कंत्राटी तत्त्वावर उसगाव पंचायतीत कामाला होती.
मात्र, कामाच्या निमित्ताने सचिवाने विनयभंग केल्याची तक्रार या युवतीने केली आहे. उसगाव - गांजेच्या पंचसदस्य मनीषा उसगावकर यांच्या सहकार्याने पीडित युवतीने ही तक्रार दाखल केली असून त्यात पंचायत सचिवाने या युवतीच्या मोबाईलवर पाठविलेले मेसेजही जोडले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.