Margao Municipality  Dainik Gomantak
गोवा

Margao News: कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करा

Shreya Dewalkar

Margao News: मलनिस्सारण व सांडपाणी जोडणी न घेता ते नाल्यातून साळ नदीत सोडलेल्या मडगाव पालिका क्षेत्रातील 140 घरमालक व 37 व्यावसायिक आस्थापने मिळून 177 जणांना पालिकेने कारणेदाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

त्या नोटिशीनुसार 15 दिवसांत मडगाव पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणती कारवाई केली याचा अनुपालन अहवाल सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देऊन पुढील सुनावणी 3 एप्रिलला ठेवली आहे.

मडगाव पालिका क्षेत्रातील काही घरमालकांनी व आस्थापनांनी मलनिस्सारण व सांडपाण्यासाठी जोडण्या न घेता त्याचे पाईप तेथील नाल्यात सोडले होते व या नाल्यातून हे घाण पाणी साळ नदीत पोहोचत असल्याची जनहित याचिका आंतोनिओ आल्वारिस यांनी सादर केली होती. यासंदर्भात खंडपीठाने मडगाव पालिकेला नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितले होते.

पालिकेने आज खंडपीठात अहवाल सादर केला, त्यानुसार अगोदर १४९ जणांना नोटीस बजावली व त्यानंतर आणखी २८ जणांना नोटिसा बजावल्याची माहिती दिली. एकूण १७७ जणांना बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये ३७ व्यावसायिकांचा समावेश आहे.

ज्यांना पालिकेने नोटीस बजावली आहे, त्या व्यावसायिक आस्थापनांकडून मलनिस्सारण व सांडपाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. त्या पाण्याचा नमुना घेऊन तपासणी केली. या तपासणी अहवालानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती मंडळाच्या वकिलांनी गोवा खंडपीठाला दिली.

ज्यांना कारणेदाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्या पंधरा दिवसात निकालात काढण्यात येतील. काहींनी अर्ज केले आहेत, तर काहींनी सांडपाणी सोडणे बंद केले आहे, अशी माहिती पालिकेने खंडपीठाला दिली.

15 दिवसांत कारवाई करा

नाल्यातून साळ नदीत मलनिस्सारण व सांडपाणी सोडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना उपद्रव होत असल्याने पंधरा दिवसांत योग्य ती कारवाई करावी असे तोंडी निरीक्षण खंडपीठाने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT