Mormugao Municipality: मुरगाव पालिका बैठकीत गाजला ‘कोळसा’

Mormugao Municipality: नगरसेवक आक्रमक: प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिण्यावर सर्वांचे एकमत
Mormugao Municipality
Mormugao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao Municipality: कोळसा प्रदूषणाचा मुद्दा आज झालेल्या मुरगाव पालिकेच्या बैठकीत चांगलाच गाजला. कोळसा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने लवकर पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहावे, असे एकमत सर्व नगरसेवकांचे झाले.

मुरगाव पालिकेची आज बायणा येथील रवींद्र भवनात झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी मुरगाव पत्तन प्राधिकरण (एमपीए) धक्का क्र. 5 व 6 वरील वाढत्या कोळसा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच संबंधित विभागांची बैठक बोलावण्याचा निर्णय मुरगाव पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला.

तसेच पूर्वीची घरे पाडून नव्याने उभारलेल्या घरांची पुन्हा रीतसर पाहणी करण्यात येणार आहे. नव्याने उभारलेल्या घरांना नवीन घरपट्टी लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले.

Mormugao Municipality
Garbage Problem: भाटी पंचायतीच्या सरपंच, सचिवांना अवमान नोटीस

या बैठकीला मुख्याधिकारी दीपेश प्रियोळकर, पालिका अभियंता व इतर नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रभाग चे नगरसेवक दामू नाईक यांनी सांगितले की, मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषणाचा जास्त त्रास जेटी, रुमडावाडा बरोबरच सडा परिसरात होतो.

प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार घेणार: बोरकर

नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले की, मुरगाव सडा, जेटी, रुमडावाडा व इतर ठिकाणी कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवता येईल याविषयी संबंधित विभागांची बैठक होणे आवश्यक आहे. तसेच मुरगाव बंदरातील व्यवसाय प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी मुरगाव पालिका पुढाकार घेणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com