Hospital Staff Shortage Dainik Gomantak
गोवा

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Madgaon Hospital Staff Shortage: दक्षिण गोव्यातील प्रमुख मडगाव जिल्हा इस्पितळात दररोज सुमारे दोन हजार रुग्णांवर उपचार व तपासणी केली जात असताना, त्या तुलनेत कर्मचारी संख्या मात्र अपुरीच आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दक्षिण गोव्यातील प्रमुख मडगाव जिल्हा इस्पितळात दररोज सुमारे दोन हजार रुग्णांवर उपचार व तपासणी केली जात असताना, त्या तुलनेत कर्मचारी संख्या मात्र अपुरीच आहे. गेल्या काही वर्षांत रुग्णसंख्या तब्बल चौपट वाढली; मात्र मंजूर ६४३ पदांपैकी १९३ पदे अद्याप रिक्त आहेत. त्यातही उपलब्ध मनुष्यबळातील निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत.

त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा भार अपुऱ्या मनुष्यबळावर पेलताना इस्पितळ प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने व्हीलचेअरवर बसवून ठेवलेले किंवा स्ट्रेचरवर उपचार घेत असलेले रुग्ण ही इस्पितळातील गंभीर समस्या आहे. मात्र, त्यासोबतच अपुरा कर्मचारी वर्ग हीदेखील मोठी अडचण बनली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असताना दक्षिण गोव्यातील या प्रमुख इस्पितळाचा कारभार मोठ्या प्रमाणावर कंत्राटी मनुष्यबळाच्या आधारे सुरू आहे.

तातडीने १०० एमटीएस कर्मचाऱ्यांची गरज : डॉ. बोरकर

कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही इस्पितळासमोरील प्रमुख समस्या असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी मान्य केले. डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या अपुरी असली तरी सध्या सर्वाधिक कमतरता एमटीएस कर्मचाऱ्यांची आहे. वॉर्डमधील रुग्णांची ने-आण, स्वच्छता व अन्य सहाय्यक कामांसाठी या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या जोरावर आम्ही कारभार हाताळत आहोत. मात्र, एमटीएस कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. सध्या तातडीने किमान १०० एमटीएस कर्मचाऱ्यांची गरज आहे. याबाबत सरकारकडे मागणी करण्यात आली आहे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

पाच महिन्यांत ३८ हजार रुग्णांची तपासणी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत इस्पितळाच्या ओपीडीमध्ये सुमारे ३८ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. याच काळात सुमारे ३,५०० रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यापैकी सुमारे ३८० रुग्णांना येथे उपचार करणे शक्य नसल्याने गोमेकॉ किंवा अन्य इस्पितळांत हलविण्यात आले. २०२५ मध्ये या इस्पितळात सुमारे ४३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. रुग्णसंख्येच्या तुलनेत मंजूर ६४३ पदे असली तरी प्रत्यक्षात सुमारे ४५० पदे भरलेली आहेत. तब्बल १९३ पदे रिक्त असून, त्यात डॉक्टरांसह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दररोज ५०० दाखल; १५०० ओपीडीत

1. २०२० मध्ये हे इस्पितळ जुन्या इमारतीतून नव्या, सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. त्याच काळात कोविडचे संकट आले आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर इस्पितळाचा कारभार सांभाळण्यात आला. आज इस्पितळात दररोज सुमारे ५०० रुग्ण दाखल असतात, तर ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे १,५०० आहे. म्हणजेच दररोज जवळपास दोन हजार रुग्णांचा भार इस्पितळावर आहे.

2. २०००च्या तुलनेत सध्या इस्पितळात येणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे चार पटीने वाढली आहे. मात्र, रुग्णसंख्येच्या तुलनेत कर्मचारी संख्या वाढलेली नाही. जुन्या इस्पितळात असलेल्या मनुष्यबळाच्या तुलनेत आजही उपलब्ध कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यात निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी एक मजला रुग्णांसाठी खुला केल्यास वाढीव रुग्णांची जबाबदारी कोणत्या मनुष्यबळावर सांभाळायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

SCROLL FOR NEXT