Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Goa Mahaaghadi Latest News: काँग्रेसची ‘राखण यात्रा’ सुरू असली तरी विरोधकांच्या महाआघाडीचे घोडे मात्र जागचे हलत नाही.
Goa Mahaaghadi Latest News
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: काँग्रेसची ‘राखण यात्रा’ सुरू असली तरी विरोधकांच्या महाआघाडीचे घोडे मात्र जागचे हलत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. भाजपने निवडणुकीच्या तयारीला वेग देत संघटनात्मक कार्यक्रम आखण्यास सुरुवात केली असताना काँग्रेसचे नेते यात्रांमध्ये व्यस्त आहेत. महाआघाडीसाठी दरवाजे खुले असल्याचे प्रत्येक नेता सांगत असला, तरी प्रत्यक्ष आघाडीच्या दिशेने ठोस पाऊल टाकण्याची तयारी कुणाचीच दिसत नाही. त्यामुळे आघाडीच्या घोषणा सध्या बिरबलाच्या खिचडीसारख्या ठरत असून, निवडणूक जवळ येत असताना विरोधकांच्या ऐक्याचा तिढा मात्र कायम आहे.

काँग्रेसच्या ‘राखण यात्रे’त अनेक ठिकाणी- उदा. बार्देश, पेडणे, डिचोलीत सामान्यांचे अस्तित्व नगण्य राहिले आहे. शिरोडा, फोंडा, प्रियोळ येथेही अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. काँग्रेसचे नेते पुढील दिवसांत सासष्टीत फिरणार असले, तरी तेथे आरजी व ‘आप’चे संभाव्य उमेदवार आहेतच. २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सासष्टीतून काँग्रेसला आठपैकी केवळ तीन जागा मिळवता आल्या होत्या. त्यातही काँग्रेससाठी हुकमी ठरणारे दिगंबर कामत आता भाजपसोबत आहेत. ते सरकारमध्ये मंत्री आहेत.

Goa Mahaaghadi Latest News
Goa Marathi Academy Controversy: 'आमच्या साहित्याचं संस्थान खालसा होणार?' गोवा मराठी अकादमीच्या कारभारावरुन धुमसणारा वाद चव्हाट्यावर

परिणामी, सासष्टीत जनाधार मिळवण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. सासष्टीत काँग्रेसला आघाडीशिवाय गत्यंतर नाही. तसेच कोण कुठली जागा लढणार, हे वेळेत ठरेल का, हा प्रश्‍‍न आहेच. ‘आप’, गोवा फॉरवर्डसोबत न गेल्यास काँग्रेसला फटका अटळ आहे. मागील टर्ममध्ये ‘आरजी’मुळे मतविभाजन झाल्याचा ठपका ठेवला होता. यावेळी एक अनाकलनीय गट पुढे येऊ शकतो. त्यामुळे मते फुटण्याचा धोका आहेच. गोवा फॉरवर्ड, ‘आप’सह असंतुष्टांना चुचकारण्याचे काँग्रेसने अद्याप काहीही प्रयत्न केलेले नाहीत. काही निष्ठावंतांची मुस्कटदाबी सुरू आहे. गिरीश-युरी मतभेद प्रकर्षाने जाणवत आहेत.

पक्षात एकोपा निर्माण करणे अद्याप शक्य झालेले नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार शुक्रवारी गोव्यात येतील; पण खरोखरीच विरोधी ऐक्याबाबत चर्चा करण्यास ते वेळ देतील का, हे माहीत नाही. पवन खेरा आले; पण ‘दरवाजे खुले आहेत’, इतकेच म्हणून थांबले. निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना विरोधकांची महाआघाडी आकाराला आली नाही, तर भाजपला वेगळे काही करण्याची गरजच भासणार नाही; विरोधकांच्या विस्कळीतपणाचे गाजर ते खुशीने चघळत बसतील.

‘गोवा राखण यात्रे’ला बहुतांश ठिकाणी संथ प्रतिसाद

सरदेसाईंनी भाजप-काँग्रेसची बाजू घ्यायची की जनतेची?

‘भाजप व काँग्रेसने गोव्याचा एकत्रितपणे विध्‍वंस केला आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप-काँग्रेस युतीची बाजू घ्यायची की गोव्यातील जनतेची, हे निश्चित केले पाहिजे’, असे ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी आज पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, प्रशांत नाईक उपस्थित होते. ‘गेल्या १० वर्षांत लोकशाहीची पूर्णपणे थट्टा सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपची यात ‘संयुक्त भागीदारी’ आहे. परिस्थिती अशी आहे की, तुम्ही कोणालाही मत दिले तरी भाजपच काँग्रेसच्या पाठिंब्याने विजयी होतो.

Goa Mahaaghadi Latest News
Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

गोव्यातील काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेवर येण्यास मदत करत आहे. परिणामी ‘फॉरवर्ड’ने भूमिका स्‍पष्‍ट करावी, असे नाईक म्‍हणाले. आमदार व्हिएगस म्हणाले की, स्वतःचा जनादेश किंवा आपल्या आमदारांचे संरक्षण करू न शकलेली काँग्रेस ‘गोवा राखण यात्रे’चा दिखावा करत आहे. काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघांमध्ये किती भू-रूपांतरे थांबवली आहेत? काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी रेईश मागूशच्या टेकड्यांचे संरक्षण का केले नाही?

‘गोवा फॉरवर्ड’चे दुर्गादास म्‍हणतात...

विजय सरदेसाई यांची भूमिका स्पष्ट आहे आणि ते ‘महाआघाडी’च्या दिशेने वाटचाल करण्यास इच्छुक आहेत. सरदेसाई सध्या लोकांची मते जाणून घेत आहेत; लोकांना अपेक्षित तेच घडेल आणि ‘पितृपक्ष’ संपल्यानंतर ते यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जनतेसमोर येतील, असे ‘आप’ नेत्यांच्या विधानावर गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com