Margao Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market: मडगावकरांचे आरोग्य धोक्यात; अस्वच्छ मासळीची होतेय विक्री, SGPDA मार्केटमधील प्रकार

Madgaon fish market: मडगावच्या एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळी घाणेरड्या पाण्यात जिमिनीवरच ठेवून विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Sameer Amunekar

सासष्टी: मडगावच्या एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळी घाणेरड्या पाण्यात जिमिनीवरच ठेवून विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (ता.१) काही पत्रकारांनी घाऊक मासळी मार्केटमध्ये फेरफटका मारला तेव्हा असे प्रकार चलतात हे स्पष्ट झाले. त्या मासळी विक्रेत्याला यासंदर्भात विचारले तेव्हा त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याने लगेच आपल्या मजुराला कामाला लावून मासळी टोपलीत भरली.

दरम्यान, कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी सांगितले की, मासळी मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी, कर्मचारी नसतातच. फातोर्डामध्ये जेव्हा मासळीत फॉर्मेलिन वापरतात असे दिसून आले तेव्हा काही काळ ‘एफडीए’ने कडक नजर ठेवली; पण आता परत एकदा मासळीमध्ये फॉर्मेलिन आहे की नाही हे पाहण्यासाठी चाचणीचा अभाव दिसत आहे.

‘एफडीए’ने लक्ष ठेवावे

आता जी मासळी मार्केटमध्ये विक्रीस येते ती ताजी दिसण्यासाठी फॉर्मेलिनचा वापर होत असल्याची शक्यता कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी व्यक्त केली आहे. सरकारने खासकरून ‘एफडीए’ने यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही गोम्स यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT