Ashtami Ferry Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगावातील फेस्त फेरीचे 12 लाख रुपये गेले कुठे?

शॅडो कौन्सिलची मडगाव नगरपालिकेला चौकशी करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मडगावात मे-जून 2022 मध्ये जुन्या मार्केटमध्ये फेस्त भरले होते. या फेस्तातून नगरपालिकेला 32 लाख रुपये महसुल प्राप्त झाला अशी माहिती देण्यात आली होती. मुख्य अधिकारी, नगरसेवक आणि कौन्सिलच्या बैठकीतही त्याचा पुनरुच्चार करण्यात आला होता. पण जेव्हा या महसुलाची आरटीआय मार्फत माहिती मागण्यात आली तेव्हा केवळ 20 लाख 77 हजार रुपयेच महसुल नगरपालिकेला मिळाला असे दाखवण्यात आले.

या महसुलात स्टॉल्समार्फत 14.65 लाख, जायंट व्हीलमार्फत 1 लाख आणि एसजीपीडीएकडून 5.10 लाख रुपये असे दाखविण्यात आले आहे. जर 32 लाख रुपये महसूल मिळाला असेल तर मग बाकी 12 लाख रुपये गेले कुठे? असा प्रश्न शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. त्याचबरोबर याची कसून चौकशी करण्याची मागणीही कुतिन्हो यांनी केली.

फेस्त फेरीतून 80 ते 90 टक्के महसूल रोकड जमा होत असते हे लक्षात घेता कुणीतरी मधल्यामध्येच या महसुलाला कात्री लावली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आणखी एक प्रकरण उघडकीस आणताना सावियो कुतिन्हो यांनी सांगितले की, 2016 पासून वेगवेगळ्या सोपो कंत्राटदारांकडून अंदाजे 1 कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यांनी दिलेल्या बॅंक गॅरंटीची मुदत संपली तरी मडगाव नगरपालिकेने ही रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केलेला नाही. काही
कंत्राटदारांनी दिलेले धनादेशांची रक्कम बॅंकेने परत पाठवल्याने नगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. तरी सुद्धा नगरपालिकेने या कंत्राटदारांवर कारवाई केलेली नाही किंवा वसुलीसाठी दबाव आणलेला नाही. त्यामुळे नगरपालिकेने ही प्रक्रिया सुलभ करण्याची मागणीही कुतिन्हो यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT