Madgaon Court Dainik Gomantak
गोवा

न्यायालयात गळती; मडगावच्या वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

मंत्री काब्राल यांच्याकडून दुरुस्तीचे आश्वासन : तीन न्यायालये सत्र न्यायालय इमारतीत हलवणार

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या जुन्या इमारतीला गळती लागल्याने त्या इमारतीत काम करणे धोक्याचे ठरल्याने आज बुधवारी दक्षिण गोवा वकील संघटनेच्या बावट्याखाली न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला.

या घटनेची कायदामंत्री निलेश काब्राल यांनी त्वरित दखल घेत वकिलांची भेट घेऊन कोर्टाच्या पुरातन इमारतीची त्वरित दुरुस्ती हाती घेण्याचे आश्वासन वकिलांना दिले. दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी नंतर या इमारतीची पाहणी केली. आणि तात्पुरता उपाय म्हणून या जुन्या इमारतीत चालू असलेली तीन न्यायालये सत्र न्यायालय इमारतीत हलविण्याचे आश्वासन दिले.

या जुन्या इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाल्याने ही पूर्ण इमारत टार्पोलीनचे आच्छादन घालून शाकारले होते. मात्र त्यातून गळती सुरू होऊन अगदी कोर्टरूम पर्यंत पाणी आल्याने शेवटी वकील रस्त्यावर आले.

दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी सांगितले, कोर्टात पाणी गळून कोर्टाला तळ्याचे स्वरूप आल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होऊनही दुरुस्ती संदर्भात कुणीही हालचाली न केल्याने निरुपायाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. या न्यायालयात ज्येष्ठ नागरिक पक्षकार म्हणून येतात ते जर पाय घसरून पडले अथवा कौले फुटून त्यांच्यावर पडली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. ही इमारत काम करण्यासाठी धोकादायक बनल्यानेच आम्हाला दुसरीकडे हलवा ही आमची मागणी आहे असे त्यानी सांगितले.

या संदर्भात बोलताना निलेश काब्राल यांनी या गळतीमुळे लोकांना आणि वकिलांना त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यासाठी तातडीने छप्पर दुरुस्तीचे काम हातात घेण्याचे ठरविले होते. मात्र तोपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झाल्याने हे काम करता आले नाही. पाऊस कमी झाल्यावर हे काम अग्रक्रमाने हातात घेतले जाईल असे त्यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT