Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Parra Crime: मारहाण करत जीवे घेण्याची दिली धमकी, कार-मोबाईलची नासधूस; पूर्ववैमनस्यातून राडा, दोघांना अटक

Goa Crime News: माडानी, पर्रा येथे पूर्ववैमनस्यातून तिघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सहाजणांपैकी दोन संशयितांना अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: माडानी, पर्रा येथे पूर्ववैमनस्यातून तिघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सहाजणांपैकी दोन संशयितांना अटक केली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये दत्ताराम हरमलकर व केन्रीक रॉिड्रग्ज (रा. साळगाव) यांचा समावेश आहे. तर संशयित रौनक कोरगावकर व इतर अज्ञात तिघेजण फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या मारहाणीमध्ये अब्दूल मुनाफ मकंदर, सोहल गौस खान इमानदार व मिथून संजी राठोड (रा. गिरी) हे तिघेही जखमी झाले.

ही हाणामारीची घटना दोन गटात, बुधवारी दुपारी २.४० च्या सुमारास घडली होती. याबाबत गुरूवारी सायंकाळी फिर्यादी अब्दूल मकंदर (रा. मोंते गिरी) याने पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादी आपल्या दोघा मित्रांसमवेत घटनास्थळी होता. त्यावेळी सहाजणांनी या तिघांवर हल्ला चढवला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत कारगाडी व मोबाईल फोनची नासधूस केली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोघा संशयितांना अटक केली तर इतरांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर हे करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loliem: 'आमची शेती वाचवा'! गावकऱ्यांची आर्त हाक; प्रवाहातील अडथळ्यांमुळे नदीचे पाणी शेतजमिनीत गेल्याने धोका

Budh Shani Yog 2026: बुध-शनिचा दुर्मिळ 'दशांक योग'! 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; बुद्धी आणि कष्टाचा सुवर्णसंगम

Formula 4 Racing Goa: ‘मोपा’वर रंगणार ‘फॉर्म्युला 4 रेसिंग थरार! ट्रॅक’ उभारणीसाठी हालचाली; 4 कोटींचा खर्च अपेक्षित

Bicholim: डिचोलीवर धोक्याची टांगती तलवार! ग्राहकांमध्ये चिंता, रोगराई फैलावण्याची भीती; काय आहे कारण? वाचा..

Goa Crime: गोवा हादरला! दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; नराधम बाप-लेकाला म्हापसा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT