Goa Crime: अनोळखी क्रमांक घेतला, महिलेला पाठवला अश्लील मेसेज; 24 वर्षीय तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला

Goa Crime News: युवक हा व्यवसायाने चालक असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७५, ७९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ व ६७-ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एका महिलेला अश्लील मजकूर पाठवून तिचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या श्रीगणेश शबादे या २४ वर्षीय युवकाचा जामीन अर्ज मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

युवक हा व्यवसायाने चालक असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७५, ७९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ व ६७-ए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी शबादे याला १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली होती. तेव्हापासून युवक न्यायालयीन कोठडीत आहे. तक्रारीनुसार १७ सप्टेंबर २०२५ रोजी शबादे याने एका अनोळखी क्रमांकावरून महिलेला अश्लील संदेश पाठवून लैंगिक सुखाची मागणी केली होती. या हरकतीमुळे त्याच्यावर विनयभंगाचा गंभीर आरोप दाखल करण्यात आला.

Goa Crime
Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

शबादे याचा हा तिसरा जामीन अर्ज होता. यापूर्वीचे दोन अर्ज फेटाळल्याची माहिती त्याने लपवून ठेवल्याचे न्यायालयाने प्रकर्षाने नमूद केले.

Goa Crime
Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

अमलीपदार्थ प्रकरणी दोघेजण निर्दोष

चरस प्रकरणी अटक केलेल्या फझल अली फरहान व अहमद कुंद्री या दोघांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने आज गुरुवारी वरील निवाडा दिला. कतारला जाण्यासाठी निघाले असता, संशयितांना दाबोळी विमानतळावर पकडले होते व दोन किलो चरस जप्त केला होता. ४ ऑक्टोबर २०१८ साली वरील घटना घडली होती. संशयितांवर अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २० ( ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Apple Support Scam Goa
Maharashtra Crime News
Goa Crime Rate Increase
WhatsApp Friend online Fraud case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com