Goa Crime: 'पैसे भरा, भरपूर व्याज देऊ'! गुंतवणूकदारांना घातला 1.69 कोटींचा गंडा; हरिओम पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक

Hariom Patsanstha fraud: धक्कादायक बाब म्हणजे, या सोसायटीने आवश्यक नियामक परवानग्या न घेताच गोव्यात आपले कार्यालय थाटले होते.
Hariom Patsanstha fraud
Hariom Patsanstha fraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना १.६९ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘हरीओम मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.’चे माजी अध्यक्ष शिवाजी जाधव यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी गोव्यातील नागरिकांना आरडी आणि मुदत ठेव (एफडी) योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. ‘तुमच्या पैशांवर भरघोस व्याज मिळेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.

Hariom Patsanstha fraud
Goa Crime: अनोळखी क्रमांक घेतला, महिलेला पाठवला अश्लील मेसेज; 24 वर्षीय तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला

धक्कादायक बाब म्हणजे, या सोसायटीने आवश्यक नियामक परवानग्या न घेताच गोव्यात आपले कार्यालय थाटले होते. मुदत पूर्तीनंतर जेव्हा गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले, तेव्हा त्यांना मुद्दल किंवा परतावा काहीच मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली.

Hariom Patsanstha fraud
Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

...तर नागरिकांनी पुढे यावे!

आर्थिक गुन्हे शाखेने या सोसायटीत गुंतवणूक केलेल्या इतर नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे किंवा माहिती असल्यास त्यांनी तपासात सहकार्य करण्यासाठी पुढे यावे. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासली जात असून, लवकरच या घोटाळ्यातील सर्व दोषींना समोर आणले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com