Goa Police Arrests  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बेदम मारहाण करून 6 वर्षाच्या मुलीचा खून, संशयितास कर्नाटक येथून अटक; तपासात धक्कादायक बाबी उघड

Macazana 6 Year Old Girl Murder Case: सलीम आपली दुसरी पत्‍नी सुमय्या आणि तिची मुले सानिका व सन्वित या ंच्‍यासमवेत माकाझान येथे एका झोपडीत राहत होता.

Sameer Panditrao

मडगाव: माकाझान येथे अमानुष मारहाण करून सहा वर्षीय मुलीची हत्‍या करणाऱ्या आणि त्‍यानंतर फरार झालेल्‍या सलीम दम्‍बल याला मायणा - कुडतरी पोलिसांनी कर्नाटकातील गदग या त्याच्या मूळ गावी जेरबंद केले.

सलीमला सायंकाळी मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. खुनासाठी वापरलेला दांडाही पोलिसांनी जप्त केला आहे. खून घडला तेथेच त्याने तो फेकून दिला होता.

इस्पितळात डॉक्टरांनी सानिकाची तपासणी केली असता, तिला मृत घोषित केले होते. डॉक्टराचे हे शब्द कानी पडल्यानंतर आपले बिंग उघड झाल्याचे कळून चुकल्यानंतर सलीमने  आपण सानिकाला दुसऱ्या डॉक्टरकडे नेऊ असे सुमय्याला सांगून तेथून पळ काढला होता.

तो आपल्या मूळ गावी गदग येथे पळून गेल्याची पक्की खबर पोलिसांना  मिळाली होती. पोलिसानी एक पथक तेथे पाठवूनही दिले होते. हे पथक संशयिताच्या मागावर होते. शेवटी सलीम हा पोलिसाच्या तावडीत सापडला. 

Goa Crime News

दुसऱ्या पत्नीच्या मुलीला मारहाण

सलीम आपली दुसरी पत्‍नी सुमय्या आणि तिची मुले सानिका व सन्वित या ंच्‍यासमवेत माकाझान  येथे एका झोपडीत राहत होता. केवळ पाणी दिले नाही म्हणून सानिकाला बेदम मारहाण केली, त्यात तिचा मृत्यू झाला. सुमय्या हिचा मूळ पती  हनुमंतराव सुगुर  हा गदग येथे राहत असून सुमय्‍याने त्‍याला सोडून सलीमशी घरोबा केला होता. पोलिसानी  हनुमंतराव याला शोधून काढून त्‍याला गोव्‍यात बाेलावून घेतले होते. त्‍याच्‍या उपस्‍थितीत मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर सानिकाचा मृतदेह त्याच्या ताब्यात दिला होता.

अनेक धक्कादायक बाबी उघड

या खुनाच्‍या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक बाबीही  सापडल्या  होत्या.  यामुळे या खून प्रकारणांचा गुंता वाढला आहे. तपास कामाबाबत पोलिसांनी सतर्कता बाळगली  आहे.  सुमय्या आपल्‍या पतीला न कळविताच आपल्या दोन मुलांसमवेत घर सोडून सलीम याच्यासह गोव्यात आली होती. ते सर्वजण बरोबर राहत होते.   पिण्यास पाणी देण्यास नकार दिल्याने सलीमने सानिकाला दांड्याने बेदम मारहाण केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

SCROLL FOR NEXT