Lyndon Parreira with Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Madgaon : लिंडन परेरा यांचा मडगावच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा

मडगाव मॉडेलला दिलेल्या शब्दानुसार गोवा फॉरवर्ड नगराध्यक्षपद सोडत आहे, नाहीतर आम्हाला कुणीही बाजूला काढू शकलं नसतं, असं वक्तव्य विजय सरदेसाईंनी केलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon : लिंडन परेरा यांनी मडगावच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. मडगाव मॉडेलला दिलेल्या शब्दानुसार गोवा फॉरवर्ड नगराध्यक्षपद सोडत आहे, नाहीतर आम्हाला कुणीही बाजूला काढू शकलं नसतं, असं वक्तव्य विजय सरदेसाईंनी केलं आहे.

गेल्या 15 महिन्यांपासून लिंडन परेरा मडगावच्या नगराध्यक्षपदी विराजमान होते. मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा हे 28ऑगस्टपर्यंत या पदावरून खाली उतरून हे पद दिगंबर कामत गटाच्या सदस्याला मोकळे करून देणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. या विषयावर चर्चा करण्यासाठी सरदेसाई यांची मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या बरोबर चर्चा झाली. त्यावेळी मी हा आमचा निर्णय कामत यांना सांगितला आहे असे सरदेसाई यांनी सांगितले होते.

मडगाव पालिका निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी एकत्र येऊन आपले संयुक्त पॅनल उभे केले होते. हे पॅनल जिंकून आल्यानंतर पहिले 15 महिने सरदेसाई गटाचा नगराध्यक्ष तर नंतरच्या 15 महिन्यासाठी कामत गटाचा नगराध्यक्ष असे ठरले होते.

28 ऑगस्टला ही मुदत संपत आहे. आम्ही सुरुवातीला जो शब्द दिला होता तो पाळणार आहोत. मडगावचा पुढचा नगराध्यक्ष कोण हे आता दिगंबर कामत आणि त्यांच्या गटाने ठरवायचे आहे असे सरदेसाई यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT