Birch by Romeo Lane Club Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

Birch by Romeo Lane Club Fire Case: लुथरा बंधू व त्यांच्या सहभागीदाराने आर्थिक फायद्यांसाठी क्लबच्या सुरक्षेशी तडजोड केली. लुथरा बंधू हे क्लबमधील उत्पन्नांचे थेट आर्थिकदृष्ट्या लाभार्थी होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: लुथरा बंधू व त्यांच्या सहभागीदाराने आर्थिक फायद्यांसाठी क्लबच्या सुरक्षेशी तडजोड केली. लुथरा बंधू हे क्लबमधील उत्पन्नांचे थेट आर्थिकदृष्ट्या लाभार्थी होते. त्यामुळे आम्ही विविध व्यवस्थापकांची नियुक्ती केली होती, असे सांगून ते नैतिकता झटकू शकत नाहीत. क्लबमधीलच स्टाफ व काही प्रत्यक्षदर्शींचे हणजूण पोलिसांनी जबाब नोंदविले आहेत.

त्यांच्यानुसार, दुर्घटनेच्या दिवशी क्लबस्थळी अग्निशमन उपकरणे किंवा फायर अलार्म वाजले नव्हते. त्यामुळे लुथरांकडून जे दावे केले जाताहेत की, त्यांनी क्लबमध्ये आपत्कालिन यंत्रणा बसविली होती, यात शाशंकता दिसते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने (फिर्यादी) मंगळवारी केला. ६ डिसेंबर २०२५ रोजी, लुथरांनी ट्रव्हल एजेंटशी संपर्क साधून विमानाचा दर किती आहे, अशी विचारणा केली होती. त्यांचा तिकिट बूक करण्याचा इरादा नव्हता.

कालांतराने, बर्च दुर्घटना रात्री ११.३०च्या आसपास घडली. त्यानंतर, लुथरांनी आपले मोबाईल ‘स्वीच ऑफ’ केले व ७ रोजी पहाटे १.१३च्या आसपास सौरभ लुथराने पत्नीच्या मोबाईलवरुन एजेंटशी संपर्क साधून, तिकिट बूक करण्यास सांगितले. त्यानुसार १.१७ वा. फुकेत-थायलंडसाठी तिकिट बूक करण्यात आली व पहाटे ५.२०वा. लुथरा फुकेतसाठी रवाना झाले. होते.

पुढील दिशा

सरकारी पक्षाने या मुद्द्यांच्या आधारे लुथरा बंधूंना जामीन देण्यास कडाडून विरोध केला आहे. जर त्यांना जामीन मिळाला, तर ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा पुन्हा देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. आता या सर्व मुद्द्यांचा विचार करून न्यायालय (Court) ५ फेब्रुवारी रोजी आपला अंतिम निकाल देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Goa Water Issue: पर्यटन नगरीत जलसंकटाची चाहूल; राज्यातील 59% जलस्रोत प्रदूषित तर 39 तलाव 'सर्वात खराब' श्रेणीत

श्वास कोंडणाऱ्या 'त्या' घटनेचा हिशोब होणार! कुंकळ्ळी अमोनिया गळतीप्रकरणी सुनावणी सुरु होणार; औद्योगिक सुरक्षेशी खेळणाऱ्यांना दणका

नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Goa Tourists Manali Trip: मनालीत गोमंतकीय पर्यटकांची मृत्यूशी झुंज! 48 जणांची सुखरुप सुटका; 'श्रीपाद भाऊं’चा मायेचा आधार

SCROLL FOR NEXT