Famous Night Club In Goa: गोव्यात नाइट आऊटचा प्लॅन करताय? तर मग 'या' दोन क्लबना भेट दिलीच पाहिजे

Famous Night Club In Goa: गोव्यात नाइट आऊटचा प्लॅन करताय? तर मग 'या' दोन क्लबना भेट दिलीच पाहिजे
Famous Night Club In GoaDainik Gomantak
Published on
Night Club
Night ClubDainik Gomantak

गोवा: एकदा तरी जीवाचा गोवा केला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मित्रांसोबत गोव्याच्या नाइटलाइफचा अनुभव तुम्ही नक्की घेतला पाहिजे.

Night Club
Night ClubDainik Gomantak

गोव्याची नाइटलाइफ: गोव्यात पर्यटक 'फन' करण्यासाठी येतात. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध अशा नाइट क्लबबद्दल जाणून घेणार आहोत.

Night Club
Night ClubDainik Gomantak

गोव्यातील नाइटक्लब: तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर क्लब क्युबाना आणि क्लब टिटोज गोवा इव्हेंट्सला नक्की भेट द्या.

Club Cubana Night Club
Club Cubana Night ClubDainik Gomantak

क्लब क्युबाना: क्लब क्युबाना हा गोव्यातील प्रसिद्ध नाईट क्लबपैकी एक आहे. हा क्लब अर्पोरा टेकडीवर आहे. हा क्लब त्याच्या निऑन-लिट, मल्टी-लेव्हल डान्स फ्लोअर आणि ओपन-एअर बारसाठी ओळखला जातो.

Club Cubana Night Club
Club Cubana Night ClubDainik Gomantak

मित्रांसोबत हँग आउट: तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हँग आउट करण्यासाठी क्लब क्युबानाला नक्की भेट दिली पाहिजे. हा क्लब रात्री साडेनऊ ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरु असतो.

Club Tito's Goa Events
Club Tito's Goa EventsDainik Gomantak

क्लब टिटोज गोवा इव्हेंट्स: टिटोज हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय क्लबपैकी एक आहे. हा गोव्यातील सर्वात जुना क्लब देखील मानला जातो. टिटोज क्लब उत्तर गोव्यात बागा बीचजवळ आहे.

Club Tito's Goa Events
Club Tito's Goa EventsDainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध क्लब: गोव्यातील हा सर्वात प्रसिद्ध नाईट क्लब आहे, त्यामुळे येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. टिटोचा नाईट क्लब रात्री 9:00 ते पहाटे 3:00 पर्यंत खुला असतो. येथे मुलींसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com