Birch Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Birch Nightclub Fire: 'बर्च' अग्निकांडातील तिघांची अखेर शरणागती; सौरभ-गौरव लुथरा आणि अजय गुप्ताचे म्हापसा न्यायालयात आत्मसमर्पण

Luthra Brothers Surrender in Mapusa Court: आत्मसमर्पणानंतर न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावत कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: हडफडे येथील नाईटक्लबला लागलेल्या आणि २५ जणांचा बळी घेणाऱ्या भीषण आग प्रकरणातील मुख्य संशयित, ‘बर्च बाय रोमियो लेन’चे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार अजय गुप्ता यांनी काल सोमवारी, सकाळच्या सत्रात (ता. १४) म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्यांचा जामीन रद्द केल्यानंतर संशयितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावल्याने त्यांना अखेर न्यायालयापुढे हजर व्हावे लागले. आत्मसमर्पणानंतर न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावत कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा दाखला देत औषधे, गादी आणि टॉवेल पुरवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची दखल घेत सत्र न्यायालयाने या मागण्या मान्य केल्या; मात्र गौरव आणि सौरभ लुथरा यांच्यासाठी शूज देण्याची मागणी तूर्तास राखून ठेवत यावर तपास अधिकाऱ्याचा अहवाल मागवला आहे. ॲड. सौम्या ड्रागो यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लुथरा यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांच्या वैद्यकीय गरजा न्यायालयाने मान्य केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT