ACGL Company Workers Dainik Gomantak
गोवा

लुईझीन फालेरोंनी एसीजीएल कंपनीच्या कामगारांची घेतली भेट

तृणमूल काँग्रेस पक्षाचे (Trinamool Congress Party) नेते तथा गोव्याचे (Goa) माजी उद्योग मंत्री व माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा दिला आहे

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या साडेतीन वर्षांपासून एसीजीएल कंपनीच्या (ACGL Company) कामगारांच्या हक्कांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने कालपासून संपावर गेलेल्या कामगारांना आज दुपारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते तथा गोव्याचे (Goa) माजी उद्योग मंत्री व माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षाचा पुर्ण पाठिंबा दिला आहे, या प्रसंगी त्यांनी भाजप सरकारांनी गेल्या दहा वर्षांत एकही उद्योग राज्यात आणला नाही, वरून गेल्या कित्येक वर्षांपासून एसीजीएल कंपनीच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका बजावलेल्या कामगारांना न्याय मिळवून न देता त्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले असा घणाघाती आरोप करून राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून या कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी केली आहे.

राज्यात हल्लीच शिरकाव केलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री लुईजन फालेरो हे आज वाळपई मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता त्यांना या कामगारांची माहिती मिळाली, व सदर कार्यक्रम आटोपून मागारी जात असताना आज दि 19 रोजी दुपारी त्यानी एसीजीएल कंपनीच्या एस एम डी विभागा समोर धरणे धरून बसलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगार नेते गुणाजी परब आणि प्रशांत खानोलकर यांच्या कडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर कामगारांना संबोधित करताना भाजप सरकार हे कामगार विरोधी असून केंद्र सरकारने नोटा बंदी करून सुमारे लाखो कामगारांना बेरोजगार केले, त्याच प्रमाणे गेल्या दहा वर्षांपासून राज्यात एकही नवा उद्योग न आणला नाही, वरून खाण बंदी आणून लाखो जणांना बेरोजगार केले, तर काही जणांना न्याय मिळवून न देता अशा प्रकारे रस्त्यावर आणले आहे हे पाहून फार दुःख होते.

औद्योगिक क्षेत्रातील कामगार हा आर्थिक विकासाचा कणा आहे, त्यांच्या कडे अशा प्रकारे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामगार टिकले तर उद्योग टिकणार त्यामुळे त्यांना प्रथम न्याय दिला पाहिजे. सद्या या भागात खाण बंदी असल्याने शेकडो कामगार व इतर खाण व्यवसायात असलेले ग्रामस्थ बेरोजगार आहेत आणि त्यात अशा प्रकारे घटना घडू लागल्या तर कामगार वर्गाने न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न फालेरो यांनी उपस्थित केला आहे, या प्रकरणी मुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्यानी तातडीने लक्ष घालून या कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे, त्याच प्रमाणे आपण या कामगारांचा विषय देशातील नामवंत अशा टाटा उद्योगसमूहच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून त्यांचे या प्रकरणी लक्ष वेधणार असल्याचे यावेळी सांगितले व कामगारांच्या लढ्याला तृणमूल काँग्रेस पक्षाचा पुर्ण पाठिंबा असल्याचे शेवटी सांगितले. यावेळी सर्व कामगारांनी त्यांना जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

यावेळी कामगार संघटनेच्या वतीने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री लुईजन फालेरो यांचे स्वागत करून अडचणींच्या वेळी येऊन पाठिंबा दिल्याने त्यांना धन्यवाद दिले आहे. दरम्यान काल पासून संपावर गेलेल्या कामगारांना बऱ्याच जणांचा वाढता पाठिंबा लाभत असून आज सकाळी सत्तरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अॅड गणपत गावकर, संजय तेंडुलकर यांनी भेट देऊन सदर कामगारांना पाठिंबा व्यक्त केला असल्याची माहिती प्रशांत खानोलकर यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे सदर कामगारांनी सरकार व कंपनीला आज मंगळवार पर्यंत तोडगा काढण्याची मुदत दिली होती, पण काहीच निष्पन्न झाले नसल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे उद्या दि 20 रोजी पासून कामगार काय पवित्रा घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT