गोवा-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला; 12 बेटांवर गोवा सरकारने केला दावा

यातच आता बेटावर ताबा मिळविण्यासाठी सुरु असलेल्या चढाओढीमुळे देशातलं राजकारण चांगलंच तापू लागल्याचं दिसत आहे.
Island
IslandDainik Gomantak

देशात राज्या-राज्यांमध्ये सुरु असलेले वाद आपल्याला काही नवे नाहीत. यातच आता बेटावर ताबा मिळविण्यासाठी सुरु असलेल्या चढाओढीमुळे देशातलं राजकारण चांगलंच तापू लागल्याचं दिसत आहे. असं असतानाच गोवा सरकारने (Government of Goa) कर्नाटकजवळ असलेल्या 12 बेटांवर दावा केला असून, त्यांचा ताबा मिळविण्यासाठी भारत सरकारकडे मागणी करणारे पत्र पाठवले आहे. भारत सरकारने या मागणीचे पत्र कर्नाटक सरकारला पाठवले असून, कर्नाटक सरकारने कारवार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Island
संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात; विधानसभा वोलमध्ये धाव

दरम्यान, कारवारच्या शेजारी असलेल्या अंजिवाडा, कूर्मगड, देवगड, गुंजी, जनीगुड्डू, मदलीगुड, मदलीगुडसह 12 बेटांवर गोवा सरकारने दावा केला आहे. त्याचबरोबर हे पत्र सावंत सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयालाही पाठवले आहे. तसेच हे पत्र गृहमंत्रालयाने कर्नाटक सरकारकडे पाठवले आहे. त्याचबरोबर या संबंधित बेटांशी तपशील कर्नाटक सरकारकडे मागितला आहे. आता कर्नाटक सरकारने ही बेटे कोणत्या तालुक्यामध्ये येतात याचा तपशील घेण्यास सुरुवात केली आहे. गोवा सरकारने अंजिदिवा या बेटावर आपला दावा केला आहे. तसेच ही बेट सध्या भारतीय नौदालाच्या ताब्यात येतात. कूर्मगड, देवगडमध्ये वीजघर आहेत. शिवाय ही बेटे कर्नाटक राज्याच्या किनाऱ्यापासून 12 ते 15 नॉटिकल मैलांच्या अंतरावर आहेत. मात्र ही बेटे कायदेशीरित्या कर्नाटकच्या हद्दीमध्ये येतात, असेही कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बेटांवर कर्नाटकचा ताबा असल्याने या हद्दीचे दस्ताऐवजीकरण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com