Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

फातोर्ड्यातून उमेदवारीवर लुईझिन फालेरो नाराज?

अद्याप फालेरोंकडून कोणतीही भूमिका स्पष्ट नाही, मात्र तर्कवितर्कांना उधाण

दैनिक गोमन्तक

पणजी : तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात खासदार लुईझिन फालेरो यांना फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लुईझिन फालेरो पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय गोटात रंगू लागली आहे. अद्याप फालेरो यांनी यावर कोणतीही जाहीर भूमिका मांडलेली नाही. (Luizinho Faleiro News Updates)

लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांना तृणमूलकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतल्याचं बोललं जात आहे. फालेरो सध्या तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार आहेत, मात्र त्यांना आमदारकीचं तिकीट दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. फालेरो यांनी आपला फोनही बंद ठेवल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं ते पक्षाला कळवणार असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.

फातोर्डा मतदार संघातून लुईझिन फालेरो यांना तृणमूलची (TMC) उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ते गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाईंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असतील. फालेरो यांना तृणमूल कडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) आणि लुईझिन फालेरो यांच्यासाठी ही चुरशीची लढत ठरणार आहे. मात्र फालेरोंच्या नाराजीमुळे सरदेसाईंसमोरील आव्हान कमी होणार असल्याचं एकंदर चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT