उत्पल पर्रीकर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही याची गॅरंटी काय?

अपक्ष लढल्यास पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर काँग्रेसचा थेट सवाल, राऊतांवरही निशाणा
Congress on Utpal Parrikar support
Congress on Utpal Parrikar supportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : एकवेळ अपक्ष उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्याबाबत विचार करता येईल, मात्र निवडून आल्यावर ते भाजपमध्ये जाणार नाहीत, याची गॅरंटी काय? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. साम वृत्तवाहिनीशी बोलताना गोवा काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कौठणकर यांनी काँग्रेस आमदारांवरील निर्बंध, उत्पल पर्रीकर, आघाडीची चर्चा याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. (Goa Assembly election 2022: Utpal Parrikar News Updates)

Congress on Utpal Parrikar support
'पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांवर बंधन लादणार'

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी भाजपविरोधी सर्वच पक्षांना उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. जर उत्पल पर्रीकर अपक्ष निवडणूक लढवणार असतील, तर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन उत्पल यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. मात्र राऊतांच्या याच आवाहनाचा काँग्रेसने (Congress) चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. एकवेळ उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्याचा विचार करताही येईल, मात्र कुठलाही पक्ष ते भाजपमध्ये परत जाणार नाहीत याची गॅरंटी देणार का? असा खडा सवाल कौठणकर यांनी उपस्थित केला आहे.

Congress on Utpal Parrikar support
Goa BJP: उत्पलच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात राजकारण

दरम्यान उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी अजून भाजप सोडलेला नाही. जोपर्यंत ते भाजप सोडत नाहीत तोपर्यंत पाठिंबा देण्याचा विचार कसा करायचा, असंही कौठणकर यांनी स्पष्ट केलं. तसेच उत्पल काँग्रेसचे सदस्यही नाहीत, त्यामुळे सदस्य नसलेल्या संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा कशी करायची असा प्रश्नही त्यांनी केला. भाजपच्या (BJP) सदस्याला काँग्रेसने पाठिंबा देण्याचं लॉजिक कोणतं असा प्रश्नही त्यांनी नाव न घेता संजय राऊतांना विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com