sarpanch Lucia carvalho And Dy sarpanch Damodar chavan Dainik Gomantak
गोवा

नावेली पंचायतीच्या सरपंचपदी लुसिया कार्व्हालो तर उपसरपंचपदी दामू चव्हाण यांची बिनविरोध निवड

तत्कालिन सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Navelim Sarpanch : नावेली पंचायतीत मनमानी कारभार सुरू असून सरपंच पॉल परेरा पंचायतीच्या कामांत पंचांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप सहा पंचाकडून करण्यात आला होता. त्यांनी 6 जून रोजी अविश्वास ठराव दाखल केलेला होता. त्यानंतर 15 जूनला झालेल्या विशेष बैठकीत सहा विरुद्ध शून्य असा ठराव संमत झाला.

दरम्यान रिक्त पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत लुसिया कार्व्हालो या सरपंचपदी तर दामू चव्हाण हे पुन्हा उपसरपंचपदी विराजमान झाले.

6 जून रोजी उपसरपंच असलेल्या दामोदर चव्हाण यांच्यासह लुसिया कार्व्हालो, मिंगुल रोझारिओ कार्दाेज, टोनी मिंगुल गोन्साल्वीस, जस्मिथा परेरा, इनासिओ सांतान, कायतान फर्नांडिस या सहाजणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.

सरपंच पॉल परेरा पंचायतीच्या कामांत पंचांना विश्वासात घेत नाहीत तसेच नावेली पंचायतीत मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 15 जूनला सहा विरुद्ध शून्य असा ठराव संमत झाला.

आज झालेल्या निवडणूकीत सहा पंचांच्या पाठिंबाने लुसिया कार्व्हालो या सरपंचपदी तर दामू चव्हाण हे पुन्हा उपसरपंचपदी विराजमान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT