Goa Weather Updates  Dainik Gomantak
गोवा

IMD on Monsoon in Goa: गोव्यात 'या' तारखेपर्यंत कमी पाऊस; IMD चा अंदाज

आत्तापर्यंतच्या पावसात 2.9 टक्के घट

गोमंतक ऑनलाईन टीम

IMD on Monsoon in Goa: गोव्यात मॉन्सूनची गती कमकुवत झाली असून राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. या हंगामात आतापर्यंत पावसाने 2.9 टक्के तूट दर्शवली आहे.

गोव्यात पुढील आठवड्यापर्यंत पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.

राज्यातील पावसाचे प्रमाण 16 ते 22 जून या काळात घटेल आणि त्यानंतर मात्र 23 जून ते 29 जून या कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

या महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. गुरुवारी गोव्यात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा 4.1 ने जास्त आहे. तथापि, पाऊस नसला तरी, समुद्राला मात्र उधाण आले आहे.

बिपरजॉयचा प्रभाव फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि कराचीच्या किनारपट्टीवर होऊ शकतो. गोव्यावर या वादळाचा फारसा परिणाम झालेला नाही. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने म्हटले आहे की, वेंगुर्ला ते वास्को दरम्यानच्या किनारपट्टीवर 3 मीटर ते 3.8 मीटर उंच लाटा उसळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT