Serendipity Arts Festival Goa 2023: दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या आर्ट्स फेस्टिव्हलच्या तारखा जाहीर; पणजीत आयोजन

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली माहिती
Serendipity Arts Festival 2023
Serendipity Arts Festival 2023Instagram
Published on
Updated on

Serendipity Arts Festival Goa 2023: गोव्याची राजधानी पणजी येथे होणाऱ्या सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा 15 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत हा फेस्टिव्हल होणार आहे.

या महोत्सवाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. सेरेंडिपिटी महोत्सवाचे हे सहावे वर्ष असणार आहे.

विविध प्रदर्शने, कला, सादरीकरण, कार्यशाळा, लाईव्ह कॉन्सर्ट इत्यादींचा या महोत्सवात समावेश असतो. या महोत्सवासाठी देशासह जगभरातून लोक पणजीत येत असतात.

Serendipity Arts Festival 2023
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ, दक्षिण गोव्यातील दरांत घट; वाचा आजच्या किमती

एप्रिलमध्ये महोत्सवाच्या क्युरेटर्सची नावे जाहीर झाली होती. महोत्सवासाठी, पारंपारिक आणि समकालीन शैलींचे मिश्रण असलेल्या हस्तकलांचा शोध संदीप कुमार संगारु आणि अंजना सोमाणी हे क्राफ्ट विभागासाठी घेणार आहेत.

गेल्या वर्षीच्या महोत्सवात नाट्य- विभागाचे संयोजन करणारे क्वासार ठाकोर पदमसी हे यावर्षी पुन्हा याच विभागाचे नेतृत्व करत आहेत. ‘अन्न’ या महत्त्वाच्या घटकाला महोत्सवाच्या या आवृत्तीत शेफ थॉमस झकारियास आणि लोकोव्हर टीम पाककला विभागाद्वारे विशेष रूपात सादर करतील.

विक्रम घोष यांनी रिकी केज सोबत गेल्या महोत्सवात संगीत विभागाचे नियोजन केले होते. यंदाही ते संगीताच्या विविध शैली आणि प्रकार याद्वारे विविध सांस्कृतिक-सामाजिक संकल्पनांना संबोधित करणाऱ्या मैफली महोत्सवात सादर करणार आहेत.

Serendipity Arts Festival 2023
Chandigarh Corporators Goa Tour: चंदीगड महानगरपालिकेचे नगरसेवक येणार गोव्यात, 'हे' आहे कारण...

गीता चंद्रन आणि मयुरी उपाध्याय शास्त्रीय, प्रायोगिक आणि समकालीन नृत्य सादरीकरणे या महोत्सवासाठी निवडतील. महोत्सवात नृत्य कार्यशाळांदेखील होतील. दृश्‍य कलांसाठी वीरांगनाकुमारी सोळंकी आणि विद्या शिवदास हे क्युरेटर आहेत.

झुबिन बालापोरिया (संगीत), विक्रम अय्यंगार (नृत्य), एलिझाबेथ यॉर्क आणि अनुषा मूर्ती (पाककला) हे विशेष क्युरेटर असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com