Louis Berger bribery scam High Court order details Dainiak Gomantak
गोवा

Louis Berger Bribery Scam: लुईस बर्जर घोटाळा प्रकरणात कामत, चर्चिल यांना दिलासा; 'पीएमएलए'चा तो आदेश हायकोर्टाकडून रद्द

Louis Berger PMLA Case Goa: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी आमदार चर्चिल आलेमाव यांना लुईस बर्जर आर्थिक गैरव्यवहार (पीएमएलए) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दिलासा दिला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी आमदार चर्चिल आलेमाव यांना लुईस बर्जर आर्थिक गैरव्यवहार (पीएमएलए) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दिलासा दिला. पूर्वपरवानगी न घेता म्हापसा येथील विशेष न्यायालयाने या दोन्ही लोकप्रतिनिधींविरुद्ध बजावलेला फौजदारी कारवाईचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.

न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी दिलेल्या निकालात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करताना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ अंतर्गत आवश्यक असलेली सरकारची पूर्वपरवानगी घेतली नव्हती. सरकारी कर्तव्यावर असताना केलेल्या कामांबाबत लोकसेवकावर खटला चालवण्यासाठी अशी परवानगी अनिवार्य असते.

नेमके प्रकरण काय? :

या प्रकरणात कामत आणि आलेमाव यांच्यावर जपानच्या सहकार्य संस्थेच्या निधीतून राबवण्यात आलेल्या प्रकल्पातील कंत्राटे देण्यासाठी सुमारे ९ लाख ७६ हजार अमेरिकन डॉलर्स इतकी लाच घेतल्याचा आरोप आहे. सुमारे १,०३१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मंजूर झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT