Dance Party Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मोठ्या आवाजात संगीत पार्टी करणे पडले महागात; चौघांना अटक

हणजुण पोलिसांनी, मोठ्या आवाजात संगीत पार्टी आयोजित करून आसपासच्या परिसरात ध्वनी प्रदूषण निर्माण केल्याबद्दल चौघांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

हणजुण: हणजुण पोलिसांनी, मोठ्या आवाजात संगीत पार्टी आयोजित करून आसपासच्या परिसरात ध्वनी प्रदूषण निर्माण केल्याबद्दल चौघांना अटक केली. यामध्ये मूळचा मुंबईचा रहिवासी असलेला हर्षित कांतारिया, तसेच वगाटोर येथील रहिवासी एलायनो परेरा आणि फरीद खान, आणि मूळचा दिल्लीचा रहिवासी करंग नारंग, यांचा यामध्ये समावेश आहे.

(‘Loud’ EDM at 7 am with no permission, gets party boys arrested in goa)

पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 7 वाजता त्यांना फोन आला की वागातोर येथील बीच (Goa Beach) क्लबमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक पार्टी सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. डीवायएसपी उदय परब यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक केली. दरम्यान पोलिसांनी वाद्यांसह साहित्यही जप्त केले.

“सकाळी ७ नंतर पार्टी सुरू होती,” एसडीपीओ म्हापसा उदय परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘ईडीएम/मोठ्या आवाजातील संगीत पार्टीचे (Party) आयोजन केले होते, यामुळे मोठ्याप्रमाणात आवाज प्रदूषण झाले होते. चारही आरोपींना ध्वनी प्रदूषण (विनियम आणि नियंत्रण) नियम 2000 आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 च्या कलम 15 अंतर्गत उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. म्हापसा एसडीपीओ उदय परब या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT