Lotulim farmers protest Borim bridge Dainik Gomantak
गोवा

Borim Bridge: भात लागवड करून बोरी पुलाला विरोध! लोटली शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; जागा संपादनास प्रतिकार

Lotulim farmers protest: बोरी पुलासाठी खाजन शेत जमीन संपादन करण्यास शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आपला विरोध दर्शविला आहे. जागा सीमांकनासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांपुढे निषेध व्यक्त केला.

Sameer Panditrao

सासष्टी: लोटली येथील शेतकऱ्यांनी गेल्या पाच सहा दिवसांपासून बोरी पुलासाठी जी खाजन जमीन सरकार बोरी पुलासाठी संपादन करू पाहात आहे, त्या जागेत भात लागवड करून बोरी पुलाला आपला विरोध दर्शविला आहे. जागा संपादनाविरुद्धचे हे आंदोलन शेतकऱ्यांनी त्या खाजन जमिनीत भात लागवड करून केले आहे.

जोपर्यंत न्यायालयातर्फे निकाल येत नाही, तोपर्यंत आम्ही येथील ९० टक्के खाजन शेतीत लागवड करणार असल्याचे एका ज्येष्ठ शेतकऱ्याने पत्रकारांना सांगितले. कारबोट, कांटूर माकझन मुंडकार असोसिएशनचे अध्यक्ष आल्बर्ट पिन्हेरो यांनी सांगितले, की जवळ जवळ २०० शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे. ही लाखो चौरस मीटर शेतजमीन आहे.

बोरी पुलासाठी खाजन शेत जमीन संपादन करण्यास शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आपला विरोध दर्शविला आहे. जागा सीमांकनासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांपुढे निषेध व्यक्त केला. खाजन शेतीचे जतन व संरक्षण हे आमचे ध्येय आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मार्ग दुसरीकडून वळविण्याची मागणी

आम्ही बोरी पुलाच्या विरोधात नाही, पुलाची गरज आम्हाला माहीत आहे. पण सरकारने दुसरीकडून हा मार्ग वळवावा एवढीच आमची मागणी आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT