Garbage | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Margao News: जुन्या बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य

जुन्या बसस्थानकावर साचलेला कचरा हटविण्याची व्यवस्था करावी. अशा सुचना स्वच्छता निरीक्षकांना दिण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Margao News: मडगाव येथील कदंब बसस्थानक सुरू होण्यापूर्वी पोलिस स्थानकासमोरील जुने बसस्थानक गजबजुन जात असे. येथूनच गोव्यातील सर्व कानाकोपऱ्यात जायला बसेस सुटायच्या.

नव्या बसस्थानकामुळे जुन्या बसस्थानकाचा वापर आता खाण्यापिण्याचे गाडे, पोलिसांनी जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जास्त होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या भागाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने घाणीसह दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याचा स्थानिकांना त्रास होत असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

मडगावच्या जुने बसस्थानक परिसरात फातिमा कॉन्व्हेंट, लॉयला हायस्कुल, पॉप्युलर हायस्कुल आहेत. शिवाय दामोदर विद्यालय, दामोदर महाविद्यालय, कायदा महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिक याच मार्गाचा वापर करतात. दररोज संध्याकाळच्या वेळेला फास्ट फूड गाड्यांची मोठी रांगच इथे असते.

लोक सुद्धा खाऊनपिऊन उष्टे व रिकाम्या बाटल्या तिथेच फेकतात. गाडेवाले कप-बशा तिथेच धुतात. त्यामुळे घाण पाणी सर्वत्र साचलेले व वाहताना आढळते. काही लोक आडोशाला येथेच लघुशंका करतात.

हे सर्व प्रकार तिथून नाहीसे करण्यासाठी पालिकेने कडक उपाययोजना करावी, कचरा टाकण्यासाठी मोठ्या टोपल्या ठेवणे, लघवीसाठी फिरत्या मुताऱ्या इत्यादींची व्यवस्था करावी, अशीही लोकांची मागणी आहे.

स्वच्छता निरीक्षकांना सुचना

या प्रकाराबाबात नगरपालिकेच्या स्वच्छता समितीचे अध्यक्ष नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी पालिकेच्या मार्केट व स्वच्छता निरीक्षकांना सुचना दिल्या आहेत.

जुन्या बसस्थानकावर जाऊन पाहणी करावी, तेथील साचलेला कचरा हटविण्याची व्यवस्था करावी. जे फास्ट फूड गाडेवाले आहेत, त्यांच्याकडे अधिकृत परवाना आहे की नाही याची सुद्धा पडताळणी करावी असे आदेश त्यांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT