Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : मतभेद बाजूला ठेवून श्रीपादना निवडून आणुया : दीपक ढवळीकर

Loksabha Election : मंगेशीत मगो पक्षाची कार्यकर्ता बैठक; विनय तेंडुलकरही उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

फोंडा, भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना निवडून आणण्यासाठी मगो-भाजपची युती असल्याने अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून काम करूया आणि श्रीपाद भाऊंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणूया, असे आवाहन मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी केले.

मंगेशी येथील शिवरंजनी सभागृहात आज (शनिवारी) झालेल्या मगो पक्षाच्या वेलिंग प्रियोळ कुंकळ्येतील कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीत दीपक ढवळीकर बोलत होते.

यावेळी भाजपचे माजी अध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे, माजी सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर, राजू नाईक, रंगनाथ कुंकळ्येकर, यामिनी कुंकळ्येकर, आदिती गावडे, हरिश्‍चंद्र जल्मी, परेश प्रभुगावकर तसेच इतर ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

मगो पक्षाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. युरींनी आधी माफी मागायला हवी. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा अधिकार युरींना नाही, त्यामुळे युरींचे वक्तव्य हे आक्षेपार्ह आणिनिषेधार्ह असल्याचेही दीपक ढवळीकर म्हणाले.

भोमचा प्रश्‍न सोडवण्यासाठी कटिबद्ध

मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, भोम गावातील मुख्य रस्त्याच्या प्रश्‍नावरून तेथील ग्रामस्थांनी भाजप सोडून इतरत्र मतदान करण्याचे जाहीर केले होते. पण तसे न करता हे ग्रामस्थ आमचेच बांधव असल्याने आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्‍न सामोपचाराने सोडवण्यासाठी प्रयत्न करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT