Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Fake Forex Trading Scam Goa: ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून सुशिक्षित लोकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे आता देशभरात पसरले आहे.
Fake Forex Trading Scam Goa
arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून सुशिक्षित लोकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे देशभरात पसरले आहे. याचदरम्यान आता वाळपई येथील एका व्यक्तीची 1.41 कोटींची फसवणूक करणाऱ्या नागपूरच्या 23 वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले. ऋषभ ईश्वरीप्रसाद हनवते (वय 23, रा. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय सायबर घोटाळ्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वाळपई (Valpoi) येथील एका तक्रारदारला आरोपीने बनावट 'फॉरेक्स ट्रेडिंग'च्या माध्यमातून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही नफा झाल्याचे भासवण्यात आले. या प्रलोभनाला बळी पडून तक्रारदाराने वेगवेगळ्या टप्प्यांवर तब्बल 1 कोटी 41 लाख रुपये गुंतवले. मात्र, जेव्हा पैसे काढण्याची वेळ आली तेव्हा आरोपीने प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने गोवा सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Fake Forex Trading Scam Goa
Goa Cyber Crime: काळजी घ्या! गोव्यात महिन्‍याला 5 सायबर गुन्हे, 267 गुन्‍ह्यांची नोंद; गृहमंत्रालयाची आकडेवारी उघड

तपासात धक्कादायक खुलासे

पोलीस निरीक्षक राहुल धाकणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. आरोपी ऋषभ हनवते याच्या बँक खात्याचे विश्लेषण केले असता फसवणुकीच्या रकमेपैकी 9 लाख 99 हजार रुपये थेट त्याच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम जमा होताच त्याने ती इतर साथीदारांच्या खात्यात वळवली होती. गोवा पोलिसांनी तातडीने नागपूर गाठले आणि ऋषभला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून असे समोर आले की, तो या मोठ्या सायबर टोळीचा एक महत्त्वाचा दुवा असून त्याचे काम पैसे गोळा करणे आणि ते वळवणे हे होते.

Fake Forex Trading Scam Goa
Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

देशभरातील 19 गुन्ह्यांशी संबंध

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे बँक खाते केवळ गोव्यातील फसवणुकीसाठी वापरले गेले नव्हते. केंद्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलच्या विश्लेषणातून असे स्पष्ट झाले की, ऋषभचे बँक खाते भारतातील इतर राज्यांमधील तब्बल 19 सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशी संबंधित आहे. याचा अर्थ त्याने आतापर्यंत देशातील विविध भागांतील लोकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.

Fake Forex Trading Scam Goa
Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

सायबर पोलिसांचे आवाहन

दरम्यान, या कारवाईनंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. "कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा संस्था जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर मार्केट किंवा क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीवर अवास्तव परतावा देण्याचे आश्वासन देत असेल, तर सावध राहा. तुमची बँक खाती कोणालाही कमिशनच्या आमिषाने वापरु देऊ नका, अन्यथा तुम्हीही अशा गुन्ह्यात अडकू शकता," असे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याचे इतर साथीदार कोण आहेत आणि या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com