

Kartik Aaryan Dating Allegations: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका वादात सापडला आहे. एका अल्पवयीन मुलीला डेट करत असल्याच्या अफवांमुळे सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. एवढचं नाहीतर त्याने त्या मुलीला आक्षेपार्ह मेसेज केल्याचा कथित 'स्क्रीनशॉट'ही व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी कार्तिकने गोव्यात (Goa) सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचवेळी करिना कुबिल्युट नावाच्या एका तरुणीनेही अगदी त्याच ठिकाणचे, त्याच बॅकग्राउंडचे आणि सारख्याच बीच बेडचे फोटो शेअर केले. यामुळे हे दोघे एकत्र सुट्ट्या घालवत असल्याच्या चर्चांना उधाण आले. ही तरुणी मूळची लिथुआनियन असून ती युनायटेड किंगडममध्ये (UK) राहते. तिचे काही जुने फोटो आणि शाळेतील माहिती समोर आल्यानंतर ती केवळ 17 ते 18 वर्षांची असल्याचे बोलले जात आहे. 35 वर्षीय कार्तिक आणि 18 वर्षांच्या मुलीच्या डेटिंगच्या बातमीने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
दुसरीकडे, हा वाद उफाळून येताच कार्तिक आणि त्या तरुणीने एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन 'अनफॉलो' केले. कार्तिकने ही गोष्ट गुपचूप केल्याचे नेटकऱ्यांच्या लक्षात आले आणि संशय अधिक बळावला. आता एका इन्स्टाग्राम युजरने कार्तिकच्या स्नॅपचॅट (Snapchat) संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये तो त्या मुलीकडे तिच्या वैयक्तिक फोटोंची मागणी करत असल्याचे दिसत आहे. मात्र, हा स्क्रीनशॉट खरा आहे की बनावट याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, या तरुणीने (करिना) एका सोशल मीडिया (Social Media) कमेंटमध्ये आपण कार्तिकची गर्लफ्रेंड नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिने म्हटले की, "मी त्याची गर्लफ्रेंड नाहीये!" तरीही नेटकरी कार्तिकच्या जुन्या लिंक-अप्स आणि त्याच्या वागणुकीवर टीका करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.