मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

GMR show cause notice: वाहन प्रवेश शुल्काच्या नावाखाली प्रवाशांची लूट होत असल्याच्या आरोपांची नागरी विमान वाहतूक संचालनालयाने गंभीर दखल घेतली
Mopa airport news
Mopa airport newsDainik Gomantak
Published on
Updated on

GMR notice Goa airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहन प्रवेश शुल्काच्या नावाखाली प्रवाशांची लूट होत असल्याच्या आरोपांची नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DCA) गंभीर दखल घेतली आहे. विमानतळ चालक कंपनी 'जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड' (GGIAL) ला १ जानेवारी २०२६ रोजी एक 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, सवलत करारातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

नेमका वाद काय आहे?

प्रवाशांनी केलेल्या तक्रारींनुसार, विमानतळाच्या टर्मिनल परिसरात वाहन सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी गेलेल्या चालकांकडून काही सेकंदांच्या विलंबासाठीही मोठे शुल्क वसूल केले जात आहे. २०१६ मध्ये झालेल्या सवलत करारातील कलम २०.५.२ नुसार, वाहनांना टर्मिनल परिसरातून जाण्यासाठी खालीलप्रमाणे 'फ्री वेळ' मिळणे अनिवार्य आहे:

  • गर्दीच्या वेळी (Peak Hours): २ मिनिटांपर्यंत मोफत.

  • गर्दी नसताना (Off-Peak Hours): ५ मिनिटांपर्यंत मोफत.

मात्र, जीएमआर प्रशासन या वेळेपेक्षा केवळ काही सेकंद जास्त झाल्यासही शुल्क आकारत असल्याचे समोर आले आहे, जे कराराचे स्पष्ट उल्लंघन मानले जात आहे.

कलम २०.५.२ चा दुरुपयोग

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने नोटिसीमध्ये म्हटले आहे की, विमानतळ चालकाची ही कृती म्हणजे २०१६ च्या सवलत कराराचा दुरुपयोग आहे. करारात नमूद केलेल्या मोफत वेळेचा लाभ प्रवाशांना मिळण्याऐवजी, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत. यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून, याचा परिणाम विमानतळाच्या प्रतिमेवरही होत आहे.

Mopa airport news
Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

७ दिवसांचा 'अल्टिमेटम'

जीजीआयएलला (GGIAL) या नोटिसीला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत विमानतळ प्रशासनाने आपला खुलासा सादर न केल्यास किंवा दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास, कराराच्या अटींनुसार त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आलाय.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासूनच तेथील टॅक्सी दर आणि पार्किंग शुल्कावरून अनेकदा वाद झाले आहेत. आता थेट संचालनालयाने नोटीस बजावल्यामुळे, प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com