Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी : ॲड. नरेंद्र सावईकर

Loksabha Election 2024 : भाजपचे सरकार केंद्रात आणण्याचा जनतेचा निर्धार

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

पणजी, भाजपच्या दोन्ही उमेदवारांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे याची जनतेला जाणीव आहे.

त्यामुळे १० वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेत जनता भाजपलाच याखेपेला मतदान करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा उपस्थित होते.

ॲड. नरेंद्र सावईकर पुढे म्हणाले, की सर्वसामान्य व्यक्ती नजरेसमोर ठेवून सरकारने कारभार केला आहे. त्यामुळे जनतेने या खेपेला भाजपचे सरकार केंद्रात आणण्याचा निर्धार केला आहे. भाजपने संकल्पपत्रातही सर्वसामान्य व्यक्तीच केंद्रस्थानी ठेवली आहे. मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे.

यामुळे ‘मोदी की गॅरंटी’ ही जनतेला आपली वाटू लागली आहे. सर्व क्षेत्रात सरकारने काम करताना सर्वसामान्य जनतेला लाभ देण्याचाच हेतू ठेवला आहे. देशाप्रमाणेच गोव्यातही विकास झाला आहे. विकासाची फळे लोकांना मिळाली म्हणून मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास बसला आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळेल.

‘सर्वांना सोबत घेऊन भाजपचा प्रचार’

ते म्हणाले, सकारात्मक विचार सोबत घेत सर्वांना सोबत घेऊन भाजपचा प्रचार पुढे जात आहे. सर्व कार्यकर्ते, नेते एकत्र येत उमेदवारांना विजयी करण्यासाठी झटत आहेत. लोकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दोन्ही उमेदवार जिंकून येतील यात शंका नाही. भाजपने कल्याणकारी योजना राबवताना कोणताही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटक भाजपसोबत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळीला उतरती कळा, 'मोपा'ची भरारी! प्रवासी संख्येत 34 टक्क्यांची वाढ; जुन्या विमानतळावर मात्र 13 टक्क्यांची घट

Goa Theft Case: 'मी विसर्जनासाठी मदत करतो' म्हणत बाप्पा हातात घेतला अन् पोबारा; म्हापशात चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीची चोरी

US Iran War: मध्यपूर्वेतील 7 महिन्यांचा थरार संपणार? ट्रम्प म्हणाले, 'अमेरिका-इराण युद्ध अंतिम टप्प्यात!' रक्तरंजित संघर्षानंतर अखेर टेबल टॉक्स सुरु?

EPFO Wage Limit: 'ईपीएफओ'चा मोठा निर्णय! वेतनमर्यादा 13 हजारांवरून थेट 25 हजार; 51 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा

Budhaditya Yog 2026: बुधादित्य अन् भद्र राजयोगाचा दुहेरी धमाका! रातोरात पालटणार 5 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार कोट्यवधींचा परतावा

SCROLL FOR NEXT