Loksabha Election  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : राज्यातील सत्ताधारी आमदार आज दिल्लीला; कारणमीमांसेच्या भीतीने अनेकांना घाम

Panaji News : दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर उपस्थित नव्हते. ते उद्या रात्री दिल्लीला निघणार आहेत. ‘बाहेरगावी असल्याने बैठकीस पोचू शकलो नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, दिल्लीत रविवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या निमित्ताने राज्यातील मंत्री आणि आमदारांना उद्या (ता. ८) दिल्लीत पोचा, असा निरोप भाजपने दिला आहे.

रविवारी होणाऱ्या शपथविधीसाठी शनिवारी रात्रीच दिल्लीत का, असा प्रश्न अनेक आमदारांना पडला असून रविवारी सकाळी दिल्लीत दक्षिण गोव्यातील पराभवाची कारणमीमांसा पक्षश्रेष्ठी करतील की काय, अशी शंका त्यांना येऊ लागली आहे. मंत्री, आमदारांना दिल्लीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण पाठविले आहे.

शिवाय प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी मंत्री तसेच आमदारांंनी शनिवारी रात्रीच दिल्लीत पोचावे, असा निरोप दिला आहे. त्यात केवळ शपथविधी सोहळ्याचा उल्लेख असला तरी रविवारी सकाळी संघटनात्मक पातळीवरील बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर उपस्थित नव्हते. ते उद्या रात्री दिल्लीला निघणार आहेत. ‘बाहेरगावी असल्याने बैठकीस पोचू शकलो नाही. आज शपथविधीचे निमंत्रण मिळाले. उद्या दिल्लीला जात आहे’, असे ढवळीकर यांनी सांगितले.

मंत्रिपद श्रीपाद की, तानावडेंना?

केंद्रीय मंत्रिमंडळात श्रीपाद नाईक की सदानंद शेट तानावडे यापैकी कोणाला संधी मिळणार, याविषयी दिल्लीत आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत निर्णय झालेला नव्हता. भाजपने आपल्या मंत्र्यांची यादी अद्याप राष्ट्रपती भवनाला सादर केली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT