Shripad Naik VS Ramakant Khalap Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024: पेडण्याचा मतदार कुणाला देणार कौल; श्रीपाद भाऊ अन् रमाकांत खलप यांची लागणार कसोटी

Shripad Naik VS Ramakant Khalap: लोकसभेची जरी ही निवडणूक असली तरी पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघांसाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालिम ठरणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024: लोकसभेची जरी ही निवडणूक असली तरी पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघांसाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालिम ठरणार आहे. उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांची पेडणे तालुक्यातून मताधिक्य मिळवण्यासाठीची कसोटी लागणार आहे.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचीही महत्त्वाची भूमिका ठरणार असून पुढील राजकीय वाटचाल याच निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांचीही तेवढीच कसोटी लागणार आहे.

दोन्ही आमदारांना त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल. मांद्रेचे मगोचे आमदार जीत आरोलकर आणि पेडणेचे भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर या दोघांनाही जास्तीत जास्त मते ही भाजपच्या पारड्यात यावीत यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे.

देशप्रभूंनी उभे केले होते आव्हान

गेल्या २५ वर्षांच्या श्रीपाद नाईक यांच्या कारकिर्दीत पेडणे मतदारसंघातून मतांची मोठी आघाडी मिळाली होती. २००९ च्या निवडणुकीत एनसीपी आणि काँग्रेस अशी युती होऊन एनसीपीने जितेंद्र देशप्रभू यांना उमेदवारी दिली. त्यावेळी श्रीपाद नाईक यांच्यासमोर जितेंद्र देशप्रभू यांनी त्यांच्यापुढे मांद्रे आणि पेडणे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भंडारी समाजाची मते, तर दुसऱ्या क्रमांकावर मराठा समाजाची मते आहेत.

भंडारी नेते म्हणून श्रीपाद नाईक ‘भाजप’ तर्फे रिंगणात आहेत. तर मराठा समाजाचे नेते म्हणून आव्हान उभे केले होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठा आणि भंडारी समाजांची एक गठ्ठा मते त्या काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप ही काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. त्यामुळे दोन्ही समाजाची मते दोघांनाही विभागून जाण्याची जरी शक्यता असली तरी कोण यात बाजी मारतो, हे निकालातूनच स्पष्ट होईल. त्या समाजाच्या नेत्यांच्या बाजूने झुकली, तर इतर समाजाची मतेही निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांना जिंकण्याची संधी मिळू शकते.

पेडण्यात ‘मगो’ची मते कुणाला?

गत विधानसभेच्या निवडणुकीत ‘मगो’ चे उमेदवार राजन कोरगावकर यांचा पराभव करत भाजपचे प्रवीण आर्लेकर यांनी आमदारकी प्रथमच प्राप्त केली. परंतु राज्यात भाजप-मगो असे सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘मगो’चे पेडणेतील अस्तित्व धोक्यात आले. या निवडणुकीत ‘मगो’ची मते भाजपला मिळतील की, मगोची मते काँग्रेसचे खलप आपल्या बाजूने वळवतील. याची उत्सुकता आहे. खासदार नाईक हे मतदारांना भेटत नाहीत. उत्तर गोव्याचा अपेक्षित विकास झाला नाही,असे काहींना वाटते,त्याचा फटका भाजपला बसेल असे दिसते.

पार्सेकर, सोपटेंची भूमिका निर्णायक?

मांद्रेत माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा फॉरवर्ड चे नेते दीपक कलंगुटकर, माजी मंत्री संगीता परब यांचीही मते ज्यांच्या बाजूने असतील तोच उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यांची मते निर्णायक ठरू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Money Saving Tips: महिनाअखेर पाकीट रिकामं होतंय? मग महिन्याच्या सुरुवातीलाच करा 'हे' 3 बदल; होईल मोठी बचत

Team India New Coach: टीम इंडियाला मिळणार नवा कोच, इंग्लंडचा 'हा' दिग्गज सांभाळणार जबाबदारी

पत्रकारितेसाठी 2025 ठरले रक्तरंजित! जगभरात महिला पत्रकारांसह 128 जणांची हत्या, 'हे' भाग ठरले सर्वात धोकादायक; रिपोर्टमधून खुलासा

VIDEO: बागा बीचवर 'मिल्की ब्युटी'चा धमाका! तमन्नाच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सनं लावलं वेड; गोव्याच्या समुद्रकिनारी रंगली न्यू इयर पार्टी

'पाश्चात्य देशांनी लसींचा साठा केला, पण भारतानं जग वाचवलं!', कोविड लसीकरणावरुन जयशंकर यांची IIT मद्रासमध्ये तूफान फटकेबाजी VIDEO

SCROLL FOR NEXT