VIDEO: बागा बीचवर 'मिल्की ब्युटी'चा धमाका! तमन्नाच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सनं लावलं वेड; गोव्याच्या समुद्रकिनारी रंगली न्यू इयर पार्टी

Tamannaah Bhatia Goa Performance: 31 डिसेंबर 2025 च्या रात्री बागा समुद्रकिनाऱ्यावर प्रसिद्ध 'लास ओलास बीच क्लब' येथे सर्वात मोठा 'न्यू इयर इव्हेंट' पार पडला.
Tamannaah Bhatia Goa Performance
Tamannaah Bhatia Goa PerformanceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातून पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली. 31 डिसेंबर 2025 च्या रात्री बागा समुद्रकिनाऱ्यावर प्रसिद्ध 'लास ओलास बीच क्लब' येथे सर्वात मोठा 'न्यू इयर इव्हेंट' पार पडला. या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूडची 'मिल्की ब्युटी' तमन्ना भाटिया आणि पंजाबी सिनेसृष्टीची शान सोनम बाजवा यांनी आपल्या परफॉर्मन्सने गोव्याच्या रात्रीचा पारा वाढवला. समुद्रकिनाऱ्यावर उधाणलेल्या लाटा आणि रोषणाईच्या झगमगाटात 2026 चे स्वागत अतिशय दिमाखात करण्यात आले.

तमन्नाचा 'लाल' अवतार आणि पॉवरपॅक परफॉर्मन्स

दरम्यान, या इव्हेंटमध्ये तमन्ना भाटियाने लाल रंगाचा ग्लॅमरस आऊटफिट परिधान केला होता, जो न्यू इयर पार्टीच्या 'व्हाईब'ला साजेसा होता. तिने आपल्या लोकप्रिय गाण्यांवर स्टेजवर असा काही डान्स केला की, संपूर्ण प्रेक्षकवर्ग थिरकायला लागला. तमन्नाच्या जबरदस्त एनर्जीने उपस्थितांची मने जिंकली. तिचे परफॉर्मन्स करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाले असून चाहते तिच्या डान्सचे आणि सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Tamannaah Bhatia Goa Performance
Goa Tourism: ..यावेळी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट! व्यावसायिकांचा दावा; खंडित विमानसेवा, आगप्रकरण कारणीभूत असल्याचे प्रतिपादन

सोनम बाजवा आणि मिलिंद गाबा यांची मेजवानी

तमन्नासोबतच पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा हिने देखील स्टेजवर आपली जादू दाखवून दिली. सोनमने लोकप्रिय बीट्सवर आत्मविश्वासाने डान्स (Dance) करत उपस्थितांना खिळवून ठेवले. याशिवाय प्रसिद्ध गायक मिलिंद गाबा याच्या लाइव्ह गाण्यांनी तरुणाईला वेड लावले. डीजे चेट्झ (DJ Chetzz), डीजे स्वप्नील आणि डीजे मॅक व्हिएरा यांनी रात्रभर संगीताची धून वाजवून 2026 च्या पहाटेपर्यंत उत्साह कायम राखला.

Tamannaah Bhatia Goa Performance
Goa News: वारखंडे जाळपोळ प्रकरणात दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; वाचा दिवसभरातील घडामोडी

गोव्याचे आकाश रोषणाईने उजळले

बागा समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्री जसा 12 चा ठोका पडला, तसे फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. लाटांचा आवाज आणि संगीताचा जल्लोष यामुळे हा सोहळा भारतामधील सर्वात मोठा बीच पार्टी इव्हेंट ठरला. सोशल मीडियावर 'लास ओलास'मधील व्हिडिओ व्हायरल होत असून नेटिझन्स गोव्याच्या या एनर्जीची प्रशंसा करत आहेत. भारतात गोव्याने लक्ष वेधले असतानाच जागतिक स्तरावर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमधील प्रसिद्ध 'बॉल ड्रॉप' सोहळ्याने 2026 चे स्वागत केले. कडाक्याच्या थंडीतही हजारो लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी एकत्र आले होते. फायनल काउंटडाउन सुरु होताच जगाने नव्या आशेने 2026 मध्ये पाऊल ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com