Loksabha Election 2024 : ‘कुंभारजुवे’तील मतदारांचा अंदाज बांधणे कठीण; आरजी, भाजपमध्ये चढाओढ सुरू

Loksabha Election 2024 : प्रचारावर बरेच काही अवलंबून : काँग्रेस अजून शांतच
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रसाद सावंत

Loksabha Election 2024 :

तिसवाडी, लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून उत्तर गोवा मतदारसंघात तिसवाडी तालुका महत्त्वाचा ठरणार आहे.

राजधानी पणजीही येथेच स्थित आहे. त्याशिवाय कुंभारजुवे, ताळगाव, सांताक्रुझ आणि सांतआंद्रे विधानसभा मतदारसंघ आहेत. कुंभारजुवेमध्ये मतदार अजूनही कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल देतील, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

प्रचारात सध्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) आणि भाजपने आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचे वास्तव्य कुंभारजुवेच्या शेजारी सांपेद्र येथे आहे, तसेच त्यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक हे कुंभारजुवेचे जिल्हा पंचायत सदस्य असल्याने त्यांचा प्रचार सुरूच आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) इंडिया गट म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मात्र, निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक असून अजून काँग्रेसचा उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचा प्रचारही सुरू झालेला नाही, ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

सक्षम नेत्याच्या बाजूने लोक

कुंभारजुवे हा बहुजन बहुल मतदारसंघ असून गोव्यात त्याची १८ पगड जात अशी ओळख आहे. येथे इतर मागासवर्गीय, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक मोठ्या संख्येत आहेत. सुमारे ९ हजार मते असून ती महत्त्वाची ठरणार आहेत.

Loksabha Election 2024
Goa Congress: उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसचे गोव्यात गुप्त सर्वेक्षण, शेजारच्या राज्यांतून दोन नेते दक्षिणेत

कुंभारजुवेत धार्मिक सलोखा बऱ्यापैकी असल्याचा दिसतो. मतदारसंघात दिवाडी, आखाडा, जुवे, वाशी, कुंभारजुवे सारखी बेटे आहेत.

कुंभारजुवेत पांडुरंग मडकईकर यांचा बऱ्यापैकी प्रभाव होता. त्यांच्या पूर्वी निर्मला सावंत यादेखील आमदार होत्या. मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास नेता सक्षम असल्यास लोक त्यांच्या बाजूने उभे राहतात. मडकईकर यांनी मगोप, भाजप आणि काँग्रेस सारख्या पक्षातून निवडणूक लढविली होती, प्रत्येक वेळी ते विजयी झाले होते. यावरून सक्षम नेत्याची निकष सिद्ध होतो.

श्रीपाद नाईक हे केवळ निवडणुकीच्या वेळी प्रचारासाठी येतात, त्यानंतर ते अदृश्य होतात. काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी एकदा घोषणा झाल्यानंतर कुंभारजुवेत आम्ही नक्की आघाडी घेणार यात काही शंका नाही.

- लॉरेन्स कुटो, कार्यकर्ता, काँग्रेस

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कुंभारजुवेत आघाडी मिळवली होती. यंदादेखील कुंभारजुवेत नाही, तर तिसवाडीतील प्रत्येक मतदारसंघात आघाडी मिळणार आहे. कुंभारजुवेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार सुरू आहे.

- जयेश नाईक, पंचसदस्य, करमळी पंचायत

कुंभारजुवे मतदारसंघात पारंपरिकरीत्या काँग्रेस मजबूत पक्ष म्हणून उभा आहे. आगामी निवडणुकीत आम्ही इंडिया आघाडी म्हणून लढणार आहोत. २०१९ च्या निवडणुकीतदेखील काँग्रेसने येथे सुमारे ८०० मतांची आघाडी घेतली होती. यावेळीदेखील अटीतटीची लढत होणार आहे. मात्र आमदार राजेश फळदेसाई यांच्यामुळे भाजपला फटका बसेल.

- गोरखनाथ केरकर, पंचसदस्य, खोर्ली पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com