Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024: सांताक्रुझमध्ये काँग्रेसचं पारडं जड; भाजपची लागणार कसोटी

Ramakant Khalap: लोकसभेसाठी उत्तर गोव्यातील कॉंग्रेसचे उमेदवार असलेले ॲड. रमाकांत खलप यांनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिल्यास त्यांना बऱ्यापैकी मदत या मतदारसंघातून होऊ शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024: पणजीला खेटून असलेला सांताक्रुझ मतदारसंघ आपले वेगळे रूप मात्र राखून आहे. पणजीत मनोहर पर्रीकर सलग पाच वेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून येत असताना हा मतदारसंघ सातत्याने कॉंग्रेसच्या बाजूने राहिला आहे. पणजी आणि सांताक्रुझच्या पायाभूत सुविधांत जमीन अस्मानाचे अंतर असल्याने महामार्ग सोडून या मतदारसंघात डोकावले असता त्याचा निमशहरी तोंडवळा चटकन नजरेत भरतो.

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले रुडाल्फ फर्नांडिस करत असले तरी मतदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले की नाही, याची परीक्षा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. याआधी टोनी फर्नांडिस यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांना नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाकारले होते. यामुळे कॉंग्रेसचे मतदार एकनिष्ठ राहिले तर कॉंग्रेसला या मतदारसंघात बऱ्यापैकी मदत मिळू शकते.

विधानसभेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत टोनी या नावाने ओळखले जाणारे आंतोनिओ फर्नांडिस ६ हजार २०२ मते मिळवून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर ते अन्य ९ आमदारांसह भाजपवासी झाले. साहजिकपणे भाजपने त्यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उमदेवारी दिली. त्यांना ६ हजार ३७७ मते मिळाली पण कॉंग्रेसचे रुडाल्फ फर्नांडिस ८ हजार ८४१ मते मिळवून विजयी झाले आहेत. याचा अर्थ या मतदारसंघातील मतदारांचा कौल हा कॉंग्रेसच्या बाजूने झुकणारा आहे. त्यामुळे लोकसभेसाठी उत्तर गोव्यातील कॉंग्रेसचे उमेदवार असलेले ॲड. रमाकांत खलप यांनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिल्यास त्यांना बऱ्यापैकी मदत या मतदारसंघातून होऊ शकते.

त्याशिवाय कॉंग्रेसला पुरक असा आणखी एक घटक कारणीभूत ठरणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड अमित पालेकर यांनी याच मतदारसंघातून २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना ४ हजार ९८ मते मिळाली होती. ती मते आणि कॉंग्रेसची मते याची गोळाबेरीज केली तर या मतदारसंघात कॉंग्रेसला मताधिक्य मिळवण्यात फारसे त्रास पडतील, असे वाटत नाही. २०१७ मध्ये ‘मगो’च्या उमदेवारीवर प्रकाश नाईक लढले होते त्यांनी २ हजार ७०७ मते मिळवली होती. ती मते भाजपकडे वळतील का, हा प्रश्न आहे. कारण २०२२ मध्ये ‘मगो’ने या मतदारसंघात उमेदवारच दिला नव्हता. त्यामुळे हे मतदार कुठे विखुरले गेले आहेत, याचा पत्ता या लोकसभा निवडणुकीत लागेलसे दिसते. टोनी यांनी पक्षांतर करूनही ७ हजार मते कॉंग्रेससोबतच राहिली असल्याचे दिसते. त्याला पालेकर यांनी आपल्या स्थानिक संपर्काची जोड दिल्यास १० हजार मते कॉंग्रेसला या मतदारसंघातून मिळू शकतील.

भाजपचे हेमंत गोलतकर यांनी २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांना ५ हजार ५६० मते मिळाली होती. तेवढी मते भाजपसोबत आजही आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे या मतदारसंघातील रहिवासी आहेत. त्यांची भूमिकाही भाजपसाठी निर्णायक ठरणार आहे. रुडाल्फ २०१७ मध्ये अपक्ष लढले होते तेव्हा त्यांना ५ हजार २६२ मते मिळाली होती. तेवढी मते आजही त्यांच्यासोबत असतील का हेही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. साधारणतः २२ हजार मतांपैकी किती मते कोणाला मिळतील, यावरच विधानसभेच्या येत्या निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT